Home » राष्ट्रीय » भाजप आमदारावर मेटाने केली कारवाई ! फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट केले बंद !

भाजप आमदारावर मेटाने केली कारवाई ! फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट केले बंद !

Meta took action : टी राजा सिंह हे तेलंगणामधील भारतीय जनता पक्षाचे एक दिग्गज नेते आहेत. ते अनेकदा त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कंपनी मेटाने त्यांच्या सोशल मिडियाचे अकाउंट बंद करण्याची कारवाई केली आहे.

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : मेटाने भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार टी राजा सिंह यांच्याशी संबंधित अनेक खाती आणि पेज काढून टाकले आहेत. इंडिया हेट लॅब (IHL) च्या अहवालात अधिकृत बंदी असूनही सिंग आणि त्यांचे समर्थक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर द्वेषपूर्ण भाषण कसे देत होते हे उघड झाल्यानंतर एका आठवड्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

मेटाच्या कारवाईवर राजा सिंह यांनी व्यक्त केली नाराजी

फेसबुक आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी असलेल्या मेटाने राजा सिंगशी जोडलेले दोन फेसबुक पेज आणि तीन इंस्टाग्राम अकाउंट काढून टाकले आहेत. भाजप आमदार टी. राजा सिंह यांनी त्यांचे आणि त्यांच्या मित्रांचे आणि कुटुंबातील सदस्यांचे सोशल मीडिया अकाउंट ब्लॉक केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यांनी याबाबत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

कार्यकर्ते आणि समर्थकांचेही अकाउंट ब्लॉक

राजा सिंह यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘फेसबुक आणि इंस्टाग्रामने माझे कुटुंब, मित्र, कार्यकर्ते आणि समर्थकांचेही अकाउंट ब्लॉक केले आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे. यापूर्वी देखील माझ्या अधिकृत खात्याला चुकीच्या पद्धतीने लक्ष्य करण्यात आले होते. आता, माझे व्हिडिओ शेअर करणाऱ्यांनाही गप्प केले जात आहे.

आमच्या धोरणाचे केले उल्लंघन : फेसबुक

याबाबत फेसबुकच्या प्रवक्त्याने एका निवेदनात सदर घडामोडीला दुजोरा देत म्हटले आहे की, “आम्ही टी राजा सिंग यांना फेसबुकवर बंदी घातली आहे, कारण त्यांनी आमच्या धोरणाचे उल्लंघन केले आहे. हिंसाचार आणि द्वेषाला प्रोत्साहन देणाऱ्या किंवा त्यात सहभागी होणाऱ्यांना आमच्या प्लॅटफॉर्मवर येण्यापासून आम्ही प्रतिबंधित करतो. संभाव्य उल्लंघनकर्त्यांचे मूल्यांकन करण्याची प्रक्रिया व्यापक आहे आणि म्हणूनच आम्ही त्यांचे खाते काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

टी राजा सिंग यांच्या प्रक्षोभक आणि धार्मिक वक्तव्याच्या इतिहासामुळे मेटाच्या ‘धोकादायक व्यक्ती आणि संघटना’ धोरणांतर्गत त्यांच्यावर बंदी घालण्यात आली. या बंदीमुळे सिंग यांना व्यासपीठावर कोणत्याही अधिकृत उपस्थितीपासून बंदी घालण्यात आली आणि त्यांचे प्रतिनिधित्व करणारी कोणतीही नवीन पृष्ठे (पेज) , गट (गृप) किंवा खाती (अकॉउंट) देखील काढून टाकण्यात आली.

२० फेब्रुवारी रोजी, मेटाने निर्णायक कारवाई केली आणि सिंग यांचेशी जोडलेली दोन फेसबुक पेज आणि तीन इंस्टाग्राम अकाउंट काढून टाकले. IHL नुसार, काढून टाकलेल्या पेजचे दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स होते, तर इंस्टाग्राम अकाउंटचे एकूण १,५५,००० पेक्षा जास्त फॉलोअर्स होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!