Headlines
Home » जळगाव » गुणवंत पोलीस पाल्यांचा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचेकडुन सत्कार

गुणवंत पोलीस पाल्यांचा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचेकडुन सत्कार

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव यांनी पोलीस विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या पोलीस पाल्यांचा सत्कार समारंभ ठेवुन त्यांचा सत्कार केला. त्यामध्ये पोलीस उप निरीक्षक सुनिल चौधरी अपर पोलीस अधिक्षक कार्यालय जळगाव यांचा मुलगा विशाल सुनिल चौधरी याने दि २८ जानेवारी २०२५ रोजी लागलेल्या MPSC परीक्षेत महाराष्ट्र राज्यात ०७ वा क्रमांक मिळवून बहुजन कल्याण अधिकारी (राजपत्रित अधिकारी) वर्ग-ब मध्ये निवड झाली.

छत्रपती संभाजी नगर येथे दि २४ जानेवारी २०२५ ते २७ जानेवारी२०२५ या कालावधीत पार पडलेल्या ६८ व्या राष्ट्रीय शालेय स्पर्धा २०२४-२०२५ मध्ये १९ वर्ष आतील गटामध्ये सॉप्टबॉल स्पर्धेत शहर वाहतुक शाखा जळगाव येथे नेमणुकीस असलेले पोहवा ज्ञानेश्वर बागुल यांची कन्या सृष्टी बागुल हिने महाराष्ट्र राज्याचे कर्णधार पद भुषवुन संघाला प्रथम क्रमांक मिळविल्याने सुवर्णपदक देवून तिचा गौरव करण्यात आला.

तसेच रावेर येथे जिल्हास्तरीय पार पडलेल्या सब ज्युनिअर ॲथलेटिक्स निवड स्पर्धत पोलीस कर्मचारी आमिल शेख यांची मुलगी ईनाया आमिल शेख हिने १० वर्षे आतील मुलीमध्ये ५० मिटर धावण्याच्या स्पर्धमध्ये व्दितीय व स्टॅडींग ब्राँड जम्पमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच त्यांचा मुलगा अदि आमिल शेख याने ०८ वर्षे आतील मुले या गटामध्ये ५० मीटर धावणे स्पर्धेत व्दितीय क्रमांक व स्टैंडीग ब्रॉड जम्पमध्ये प्रथम क्रमांक पटकावुन त्यांची पंढरपुर येथे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धा २०२५ मध्ये निवड झाली आहे.

यावेळी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, यांनी गुणवंत पाल्यांचा सत्कार करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!