MH S M Journalist Association Mumbai : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई, रावेर तालुका शाखा कार्यकारणीची मुदत संपल्याने नवीन अध्यक्ष पदासाठी इच्छुकांची नावे वरिष्ठांकडे पाठविण्याबाबत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला.
रावेर ( प्रतिनिधी ) इकबाल पिंजारी : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना, मुंबई या संघटनेची रावेर तालुका स्तरीय सभा खेळीमेळीच्या वातावरणात रावेर तालुका अध्यक्ष प्रमोद कोंडे यांच्या अध्यक्षतेखाली निंभोरा येथील कृषी तंत्र विद्यालय येथे दि.२९ रोजी घेण्यात आली. यावेळी अनेक विषयांचा आढावा घेण्यात आला.
दरम्यान आजच्या या सभेत मागील सभेचा वृत्तांत संघटनेचे सचिव इकबाल पिंजारी यांनी वाचून दाखविले तसेच आगामी काळात संघटनेची तालुका कार्यकारणीची एक वर्षांची मुदत संपत असल्याने सभेतील सदरील विषयानुसार संघटनेच्या रावेर तालुका अध्यक्ष पदाकरीता जे सदस्य इच्छुक असतील त्यांची नावे वरिष्ठांना पाठविणे बाबत ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. अध्यक्ष पदासाठी रविंद्र महाजन, इकबाल पिंजारी, विजय एस.अवसरमल तसेच सुमित पाटील हे इच्छुकांची नावे सर्वानुमते वरिष्ठांना पाठविण्याबाबत प्रमोद कोंडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला.
सदर सभेस विनोद कोळी उर्फ शिवा भाई (खानदेश विभागीय प्रसिध्दी प्रमुख), प्रमोद कोंडे (अध्यक्ष), इकबाल पिंजारी (सचिव), प्रभाकर महाजन (उपाध्यक्ष), रवींद्र महाजन (कार्याध्यक्ष), कैलास लवंगडे, संजय पाटील, विजय एस अवसरमल (संघटक), प्रकाश पाटील (सल्लागार) विजय के अवसरमल (सह सल्लागार) सुमित पाटील (सदस्य) संजीव चौधरी (सदस्य) आणि संजय पाटील (सदस्य) तसेच इतर सदस्य उपस्थित होते.
