Home » राष्ट्रीय » महाराष्ट्राच्या ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा आंतरराष्ट्रीय गौरव ; प्रतिष्ठेचा ‘स्कॉच पुरस्कार’ प्रदान

महाराष्ट्राच्या ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा आंतरराष्ट्रीय गौरव ; प्रतिष्ठेचा ‘स्कॉच पुरस्कार’ प्रदान

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या संकल्पनेतून राबविलेल्या “शासन आपल्या दारी” या उपक्रमाला प्रतिष्ठीत स्कॉच पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. देशभरातील विविध श्रेणीतील २८० प्रकल्पांमधून “शासन आपल्या दारी” ची निवड करण्यात आली. शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या माणसापर्यत पोहोचवून त्याचे जीवन सुखकर करण्यासाठी हा उपक्रम मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाने वर्षभर यशस्वीरीत्या चालवून पाच कोटींहून अधिक लाभ नागरिकांच्या दारी पोहचविले आहे.

गेल्यावर्षी दि.१५ मे रोजी सातारा जिल्ह्यातील पाटण या ठिकाणाहून सदर उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला होता. महाराष्ट्राच्या या उपक्रमाने स्कॉच अवार्ड च्या नागरिक-केंद्रित प्रशासन या श्रेणीत ८० हून अधिक उपक्रमांना मागे टाकत अंतिम फेरी गाठून पुरस्कार पटकाविला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “शासन आपल्या दारी” च्या प्रत्येक उपक्रमाला व्यक्तिश: हजेरी लावली होती. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी देखील हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.

मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव डॉ. अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष स्थापन करून समर्पित टीम तयार करून हा उपक्रम राबविण्यात आला. राज्यातील सर्व जिल्ह्यात शासन आपल्या दारीचा उपक्रम प्रचंड प्रतिसादात पार पडला. आता आम्ही “शासन आपल्या दारी २.०” राबविण्यासाठी सज्ज असल्याची प्रतिक्रिया डॉ. अमोल शिंदे यांनी दिली.

या उपक्रमासाठीचा पुरस्कार मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे प्रमुख डॉ. अमोल शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी ‘स्कॉच ग्रुप’ चे अध्यक्ष समीर कोचर, उपाध्यक्ष डॉ. गुरुशरण धंजल, व्यवस्थापकीय संचालक दीपक दलाल उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!