Headlines
Home » जळगाव » मू.जे. महाविद्यालयात ‘हे जीवन सुंदर आहे’ या विषयावर व्याख्यान

मू.जे. महाविद्यालयात ‘हे जीवन सुंदर आहे’ या विषयावर व्याख्यान

डावीकडून प्रा. देवेंद्र इंगळे, डॉ. सागर बडगे आणि मार्गदर्शन करतांना डॉ. नितीन विसपुते

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मूळजी जेठा महाविद्यालयात ‘हे जीवन सुंदर आहे’ या विषयावर १० सप्टेंबर, जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त समाजशास्त्र विभागातर्फे डॉ. नितीन विसपुते (संचालक, चेतना व्यसनमुक्ती उपचार केंद्र, जळगाव.) यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांशी त्यांनी सुसंवाद साधला. ‘हे जीवन सुंदर आहे’ यावर बोलतांना त्यांनी विविध व्यसनांपासून विद्यार्थ्यांनी कसे दूर राहावे हे उदाहरण देऊन पटवून सांगितले. आत्महत्या, नैराश्य, व्यसन यावर मात करण्यासाठी नियमित व्यायाम, सकस आहार, मोकळा सुसंवाद, पुरेशी झोप, ध्यानाचे महत्व, योग्य व्यक्तीसोबत मैत्री याबद्दल मार्गदर्शन केले.

कौटुंबिक सुसंवाद साधल्याने व्यक्तीच्या मनातील भाव-भावना व्यक्त केल्यास, मन मोकळं केल्यास आयुष्यातील बऱ्याचश्या गोष्टी सोप्या होवू शकतात. व्यसनावर मात करता येते. असे त्यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमा प्रसंगी अध्यक्षस्थानी प्रा. देवेंद्र इंगळे (संचालक, सामाजिक शास्त्र, प्रशाळा,) हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सागर बडगे (समाजशात्र विभाग प्रमुख) यांनी केले. तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. हर्षा महाजन यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!