जळगाव ( वास्तव पोस्ट ) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव अंतर्गत आंतर विभागीय मैदानी (पुरुष व महिला) स्पर्धा २०२४ चे आयोजन खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालय जळगांव येथे दि.९ व दि.१० डिसेंबर २०२४ रोजी करण्यात आले. यामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत सर्व विभागातील एकूण १०६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
स्पर्धेचे उद्घाटन के.सी.ई. सोसायटीचे कोषाध्यक्ष डी.टी. पाटील व मू.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एन. भारंबे यांच्या हस्ते ध्वजारोहण व विद्यापीठ खेळाडूंच्या हस्ते आगमन झालेल्या क्रीडा ज्योतचे प्रज्वलन करण्यात आले. यांनतर विभागातील सर्व खेळाडूंचे संचालन करण्यात आले.

याप्रसंगी मू.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एन. भारंबे, क.ब.चौ.उ.म.विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील, जळगांव क्रीडा विभागाचे सचिव डॉ. आनंद उपाध्याय, धुळे क्रीडा विभागाचे सचिव प्रा.महेंद्र नगराळे, एरंडोल क्रीडा विभागाचे सचिव प्रा.किशोर वाघ, याचबरोबर डॉ.पी.आर. चौधरी, डॉ.संजय चौधरी, डॉ.निलिमा पाटील, डॉ.डी.एस. इंगळे, डॉ.जुगलकिशोर दुबे, प्राचार्य डॉ.अशोक राणे, प्रा.जितेंद्र पाटील, प्रा.सुभाष वानखेडे, डॉ. महेश पाटील, प्रा.प्रविण कोल्हे, डॉ.रणजित पाटील, प्रा.प्रणव बेलोरकर, प्रा.अमर हटकर, प्रा.नितीन चौधरी, व जळगांव क्रीडा विभागातील महाविद्यालयांचे क्रीडा संचालक उपस्थित होते.
स्पर्धेचे प्रास्ताविक व आभार मू. जे. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ.श्रीकृष्ण बेलोरकर यांनी केले. तसेच डॉ.अशोक राणे व डॉ.दिनेश पाटील यांनी उपस्थित खेळाडू विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले. सदर स्पर्धा ह्या मू.जे. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ.श्रीकृष्ण बेलोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या.
