जळगाव | दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पूर्वतयारीसाठी सीमावर्ती भागातील अधिकारी यांची बैठक दुरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाली. बैठकीत निवडणूक निष्पक्ष वातावरणात करण्यासाठी आंतरराज्य व आंतरजिल्हा समन्वयाबाबत चर्चा करण्यात आली, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, तपासणी नाके 24 X 7 कार्यान्वीत ठेवणे व भारत निवडणूक आयोगाकडील प्राप्त निर्देशांनुसार आवश्यक कार्यवाही करणेबाबत चर्चा झाली .

बैठकीला मध्यप्रदेश राज्यातुन बऱ्हाणपुर व बडवाणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्ह्यातील सीमावर्ती भागाचे उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच महाराष्ट्र राज्यातील बुलडाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्ह्यातील सीमावर्ती भागाचे उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांची उपस्थिती होती.
