Headlines
Home » जळगाव जिल्हा » गजाला पिंजारी या चिमुकलीचा यंदा पहिला रोजा !

गजाला पिंजारी या चिमुकलीचा यंदा पहिला रोजा !

ऐनपूर ( वास्तव पोस्ट ) : मुस्लिम धर्मीय पवित्र रमजान महिन्याला दि.२ मार्च पासून सुरवात झाली. दि.३ मार्च रोजी गजाला इकबाल पिंजारी या इयत्ता दूसरीत शिकणाऱ्या ७ वर्षीय मुलीने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा यशस्वी पूर्ण केला. गजाला पिंजारी ही चिमुकली रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते इकबाल पिंजारी यांची मुलगी आहे.

रमजान, हा इस्लामिक कॅलेंडरचा नववा महिना आहे. जगभरातील मुस्लिम उपवासाचा महिना म्हणून तो पाळतात. संपूर्ण रमजान महिन्यात, मुस्लिम लोक पहाटेपासून संध्याकाळपर्यंत खाण्यापिण्यापासून दूर राहतात. पाण्याच्या एका घोटामुळे देखील त्यांचा उपवास रद्द होऊ शकतो. मोठ्या मंडळीसह चुमकल्यांचे रोजेही विशेष लक्ष वेधणारे असतात. संपूर्ण रमजान महिना म्हणजेच ३० दिवस उपवास ठेवले जातात.

इतक्या कमी वयात प्रथमच रोजा ठेऊन आपला पहिला रोजा यशस्वी केल्याने गजाला हिचे समाजातून कौतुक तसेच अभिनंदन होतं आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!