जळगाव ( वास्तव पोस्ट ) : इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च मध्ये विद्यार्थ्यांसाठी आर्थिक क्षेत्रातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि मशीन लर्निंग यावर व्याखान घेण्यात आले . त्याप्रसंगी इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ.बी.व्ही. पवार, के.सी.ई. सोसायटीचे मॅनेजमेंट कॉन्सिल मेंबर डॉ.शिल्पा बेंडाळे, व्याख्याते म्हणून पिरामल कॅपिटल अँन्ड हॉसिंग फायनान्स लिमिटेड चे जोखीम विश्लेषण प्रमुख दीपक चौधरी, अधिष्ठांता स्कुल ऑफ कॉम्पुटर अप्लिकेशन प्रा.डॉ. वर्षा पाठक, तसेच अधिष्ठाता स्कुल ऑफ मॅनेजमेन्ट स्टडीज डॉ.ममता दहाड उपस्थित होते.

याप्रसंगी व्याख्याते दीपक चौधरी यांनी AI and ML या विषयाबद्दल विद्यार्थ्यांना सखोल माहिती देत, कर्ज देणाऱ्या क्षेत्रांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग यांचा वापर करून ग्राहकांच्या परतफेड क्षमतेची विश्लेषण कशा पद्धतीने केले जाते याबद्दल त्यांनी पिरामल फायनान्स कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळे दाखले देऊन समजावून सांगितले.
कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना त्यांचे कर्ज परतफेडी ची क्षमता ओळखण्यासाठी ऑटो एम.एल. टूल्स, जनरेटिव्ह AI, XG बूस्ट, LLM मॉडेल्स, इत्यादी तंत्रज्ञानाचा उपयोग आणि त्यामागील फायनान्स कंपनीची पार्श्वभूमी समजावून सांगितली. फ्रॉड ग्राहक, फसविणारे ग्राहक, परतवणूक न करू शकणारे ग्राहक ओळखण्याचे तंत्रज्ञान AI चा वापर करून विकसित करण्यात आले असून त्या संदर्भात विस्तृत माहिती दिली.
तसेच या क्षेत्रामध्ये आजच्या तरुणांना भरपूर स्कोप असून त्यासाठी सुयोग्य अभ्यासक्रम बनवणे आवश्यक असल्याचे त्यांनी याप्रसंगी अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जयश्री चौधरी यांनी केले.
