नाशिक | दि.२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – महाराष्ट्र कामगार दिना निमित्त नाशिक जिल्ह्यात खुटवड नगर, सातपूर,नाशिक रोड, सिन्नर, मालेगांव, घोटी,व दिंडोरी या विभागांमध्ये सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्य अध्यक्ष डॉ.डी.एल.कराड यांच्या नेतृत्वाखाली १ मे महाराष्ट्र कामगार दिना निमित्त झेंडावंदन करून कामगार दिन साजरा करण्यात आला. तसेच केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणावर देखील चर्चा करण्यात आली.
यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार दिनाबाबतचे महत्व सिटूचे जिल्हा अध्यक्ष कॉ. सीताराम ठोंबरे, सरचिटणीस कॉ. देविदास आडोळे, कॉ. तुकाराम सोनजे, कॉ.दिनेश सातभाई, कॉ. आप्पा वटाणे, कॉ.नागेश धुर्वे, कॉ. हरिभाऊ तांबे, कॉ.संतोष कुलकर्णी, कॉ. दत्ता राक्षे, कॉ.चंद्रकांत लाखे, कॉ. आप्पासाहेब भोले, कॉ. सुनील मालुंजकर, कॉ. भिवाजी भावले, कॉ. सिंधू शार्दुल, कॉ. मोहन जाधव, कॉ. प्रकाश चौधरी, कॉ. हिरामण तेलोरे, कॉ. स्वरूप वाघ, कॉ. राहुल गायकवाड, या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वरील विभागामध्ये झेंडावंदन करून महाराष्ट्र दिनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी कामगार वर्गाची भक्कम एकजूट करून कामगारांना न्याय मिळणेसाठी संघर्ष तीव्र करण्याचे व लोकसभा निवडणुकीत कामगार विरोधी भाजपा व मित्र पक्षाच्या उमेदवारांचा पराभव करण्याचे आवाहन विविध वक्त्यांनी केले. याप्रसंगी कॉ.कल्पना शिंदे, कॉ. छाया जाधव, कॉ.संजय पवार, कॉ.अरविंद शहापुरे, कॉ. युवराज पाटील, कॉ. निवृत्ती केदार आणि कामगार, शेतकरी आदी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
