जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्ह्यात दि.१३ डिसेंबर ते दि. २६ जानेवारी २०२५ पर्यंत वैज्ञानिक तथा औद्योगिक संशोधन परिषद CSIR व राष्ट्रीय विज्ञान संचार तथा नीती संशोधन परिषद NISCPR आणि सर्वोदय इन्फोटेक यांनी मिळून भारतातील शेतकऱ्यांसाठी ‘किसान सभा एप्लीकेशन’ ची निर्मिती केलेली आहे. या किसान कार्ड एप्लीकेशनच्या माध्यमातून भारतातील सर्व शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीने शेती करता येईल, तसेच शेतमालाचे आधुनिक पद्धतीने वाहतूक करण्यास मदत होईल. या साठी संपूर्ण भारतभर शेतकऱ्यांसाठी अल्प दरात किसान कार्ड योजना राबवण्यात येत आहे.

किसान कार्ड योजनेचे अनेक फायदे आहेत. कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्व प्रकारची कृषी माहिती उपलब्ध होत आहे. शेतकऱ्यांना देशातील कोणत्याही बाजारपेठेतील पिकांची किंमत घरबसल्या कळेल. शेतकऱ्यांना कंपनी डीलरशिप सोबत थेट संपर्क साधता येईल. तसेच शेतकऱ्यांनी तयार केलेले अन्नपदार्थ जसे की लोणचे, घरगुती वस्तू , स्वयंचलित उद्योगाचे सामान सहजतेने विकले जाऊ शकते.
शेतकऱ्यांनी कृषी उपकरणे खरेदी करणे, त्यात त्यांना सूट मिळणे आणि संबंधित व्यापाऱ्यांशी थेट संबंध साधने हे किसान सभा कार्डचे ध्येय आहे. त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या शासकीय योजनांची संपूर्ण माहिती शेतकरी, मंडी, डीलर, कृषी केंद्र व ट्रान्सपोर्ट यांच्यापर्यंत पोहोचवुन एक साखळी निर्धारित केली जात आहे. यात सर्वांचे हित सुधारण्याचा प्रयत्न किसान सभा कार्डच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
किसान कार्ड सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि फायदेशीर आहे ज्यात सर्व प्रकारच्या सुविधा सहज मिळतील हर कदम हर डगर किसान का हमसफर कृषी क्षेत्राशी संबंधित आहे. उत्पादक आपल्या सेवा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी किसान सभा ॲप शी जुडून शेतकऱ्यांना लाभ देतील.
अशा प्रकारे संपूर्ण राज्यभरात किसान सभेचे कार्य केले जात आहे. जळगाव, धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी कॅम्पचे आयोजन करण्यात येत आहे किसान सभा कार्डचे कर्मचारी प्रत्येक गावात जाऊन कॅम्प आयोजित करीत आहेत. त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी किसान कार्ड काढून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

उत्तम कार्यप्रणाली जी शेतकऱ्यांना भविष्यात अधिकाधीक उपयुक्त ठरणार aahe