Home » जळगाव » केसीई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविदयालयात खान्देश रोजगार मेळाव्यास अभूतपूर्व प्रतिसाद          

केसीई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविदयालयात खान्देश रोजगार मेळाव्यास अभूतपूर्व प्रतिसाद          

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एजुकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग महाविद्यालयात “खान्देश रोजगार मेळावा २०२५” चे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागातर्फे खान्देशातील विद्यार्थ्यांना रोजगार संधीचे आयोजन करण्यात आले होते. तरुणाईला रोजगाराच्या आणि कौशल्य विकासाच्या संधी एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आली. विविध उपक्रमांतून शिक्षण, रोजगार आणि सामाजिक विकासाच्या संधी उपलब्ध करून त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न होता.

एकाच छताखाली मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्या एकत्र येऊन आयोजित करण्यात आलेला हा रोजगार मेळावा तरुणांसाठी आयुष्य बदलवणारा होता. सकाळी ९:३० वाजल्यापासून सुरू होणाऱ्या या मेळाव्यात १८ ते ४५ वर्षे वयोगटातील दहावी, बारावी,आयटीआय, डिप्लोमा, बी टेक, बीई, अभियांत्रिकी क्षेत्र, बीसीए, एमसीए, एमबीए, बीसीएस, एमसीएस पदवी किंवा कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असलेल्या तरुण-तरुणींना नोकरीची संधी उपलब्ध झाली.

या उपक्रमाला प्रमुख अतिथी केसीई सोसायटीचे कोशाध्यक्ष डी.टी पाटील तसेच सद्यस्य संजय प्रभुदेसाई लाभले. उपस्थित रंगमंचावर प्रमुख मान्यवर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी, अकॅडमिक डीन् डॉ सी.एस. पाटील, डॉ. ए.पी.जे. कलाम कौशल्य विकास विभाग प्रमुख प्रा.संजय पावडे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डीन् प्रा.-गणेश पाटील, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट चे प्रा.मनीष महाले यांचे हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन झाले. आयक्यूएसी समन्व्यक प्रा.कल्पेश महाजन तसेच प्रा.अविनाश सूर्यवंशी, एमबीए विभाग प्रमुख प्रा. हर्षा देशमुख, एचआर  विभाग प्रा.श्रुतिका घरडे यांचे हस्ते उपस्थित कंपनी प्रतिनिधिंचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

अधिकाधिक तरुणांना रोजगार देण्याचे ध्येय बाळगून  केसीई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट जळगाव तर्फे हा मेळावा घेण्यात आला. जळगाव  शहरातून व ग्रामीण भागातून १००० हुन अधिक उमेदवारांनी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज केले होते. ४० पेक्षा जास्त कंपनींचे प्रतिनिधी हजर  होते. यावेळी मुलाखतीद्वारे ३५० मुलांची निवड करण्यात आली.

या उपक्रमाला केसीई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांचे मार्गदर्शन मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुषी, ओचानी व स्नेहल चौधरी तर आभार प्रदर्शन प्रा. मनीष महाले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता प्रा.अविनाश सूर्यवंशी, प्रा.प्रवीण भंगाळे, प्रा.डॉ वीणा भोसले, प्रा.जगदीश पाटील, प्रा.राहुल पटेल, प्रा.के.बी. पाटील, प्रा.सचिन भंगाळे, प्रा.विकास नारखेडे, प्रा.रेवती पाटील, प्रा.हेमंत धनंधरे, प्रा.तनया भाटिया, प्रा.स्नेहा पाटील, प्रा.देवेंद्र पाटील प्रा.कोमल जैन, प्रा.नीरजकुमार पदमे, प्रा.स्वाती बाविस्कर, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक वृंद,अशोक काळे, शिक्षकेतर  कर्मचारी, विदयार्थी समन्व्यक हर्ष कोटेचा ,भावेश भन्साळी, नेहा लोंढे, रोहित सोनवणे यांचे सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!