Home » जळगाव » मु.जे. महाविद्यालयात ५ जानेवारी रोजी ‘खान्देश गॉट टॅलेंट-२०२५’ कार्यक्रमाचे आयोजन

मु.जे. महाविद्यालयात ५ जानेवारी रोजी ‘खान्देश गॉट टॅलेंट-२०२५’ कार्यक्रमाचे आयोजन

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असणार मराठी सिने अभिनेत्री अनिता दाते

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगावच्या शैक्षणिक क्षेत्रात शिक्षणासोबतच इतर सर्व कलांचे शिक्षण घ्यावे हा ध्यास खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीतील सर्व संचालकांनी घेतला होता आणि त्यांचा तो ध्यास पूर्ण होताना आज दिसत आहे. शैक्षणिक विकासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासाला पुरक अशी उपक्रमशिलता विद्यार्थ्यांमध्ये कार्यान्वित करण्याची यशस्वी परंपरा या महाविद्यालयाला लाभली आहे.

मु.जे. महाविद्यालयाच्या इव्हेंट मॅनेजमेंट विभागातर्फे गत सहा वर्षाच्या यशस्वीरित्या प्रतिसादामुळे या वर्षी देखील ‘खान्देश गॉट टैलेंट २०२५ सिझन-७’ हा कार्यक्रम रविवार दि.०५ जानेवारी २०२५ रोजी जळगावात मूळजी जेठा महाविद्यालय, इव्हेंट मॅनेजमेंट विभाग व रामलालजी चौबे मेमोरीयल ट्रस्ट जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणार आहे. या निमित्ताने जळगाव जिल्ह्यातील कलावंताना एक भव्य आणि आश्वासक रंगमंच उपलब्ध होणार आहे. या कार्यक्रमात नृत्य, नाट्य व संगीत या कलांचा समावेश करण्यात आला आहे.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणून मराठी सिने अभिनेत्री अनिता दाते (झी मराठी वरील सुप्रसिद्ध मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ व ‘नवा गडी नवा राज्य’ फेम) यांना आमंत्रित केले असून त्याच बरोबर प्रमुख पाहूणे म्हणून आमदार राजू मामा भोळे, रामलाल चौबे मेमोरियल ट्रस्ट चे अध्यक्ष प्रकाशजी चौबे, ॲड, नारायण लाठी, डॉ. निलेश चांडक, ॲड. संजय राणे, उद्योजक प्रमोद संचेती, उद्योजक तेजांस कडू, ॲड. राजेश झाल्टे, समाजसेविका आशा अंभोरे, प्रवीण कुंजिवाल, नोबेल स्कूलच्या चेअरमन अर्चना सूर्यवंशी, के.सी.ई. सोसायटीचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर, महाविद्यालयाचे प्राचार्य सं.ना. भारंबे, आदी मान्यवरांची उपस्थितो असणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!