Headlines
Home » जळगाव » केसीई सोसायटीचे शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे हिवाळी शिबिर संपन्न

केसीई सोसायटीचे शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे हिवाळी शिबिर संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, संलग्नित केसीईसोसायटीचे शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगाव, राष्ट्रीय सेवा योजनाविभागाकडून दि १५ जानेवारी ते दि २१ जानेवारी या कालावधी मध्ये दत्तक गाव मोहाडी येथील कै.गोटूभाऊ सोनवणे माध्यमिक विद्यालय मोहाडी, ता.जि. जळगाव येथे हिवाळी श्रम संस्कार शिबिर घेण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. अशोक राणे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून के.सी.ई. सोसायटीचे एस.एस.मनियार विधि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी. युवाकुमार रेड्डी हे होते. विशेष उपस्थिती कै. गोटूभाऊ सोनवणे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय शिरसाट होते. उद्घाटनाप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. आकाश बिवाल यांनी प्रस्तावना सादर केली.

सात दिवस चाललेल्या या शिबिरास भारतीय ज्ञान परंपरा- डॉ. चेतन चौधरी, शिक्षण व रोजगार- डॉ रंजना सोनवणे, पारंपरिक ऊर्जा- डॉ.सुनिता नेमाडे, आरोग्य व योगा- प्रा.आकाश बिवाल, बालविवाह कायदे- प्रा. गणपत धुमाले, मतदानजनजागृती- प्रा. संभाजी जमदडे, व्यक्तिमत्व विकास- डॉ गणेश पाटील, सायबर सेक्युरिटी- प्रा. संदीप केदार वाचन प्रेरणा- एम.एम. वनकर  अशा विविध विषयांवर विषय तज्ञांनी आपले विचार मांडले.

शिबिरामध्ये गावातील साफसफाई, शाळेतील साफसफाई, नागाई-जोगाई  मंदिर परिसरातील साफसफाई व वृक्षारोपण करण्यात आले. तसेच कांताई बंधारा व आमराई विद्यार्थ्यांना या ठिकाणी विद्यार्थ्यांना नेण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सेवायोजनेचे जळगाव तालुका समन्वयक डॉ. राजू गवरे यांनी शिबिरास भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिबिरातील सर्व दिवसाचे सूत्रसंचालन व आभार विद्यार्थ्यांनी केले. समारोपाला के.सी.ई. सोसायटीचे रेडीओ मनभावनचे संचालक अमोल देशमुख होते. त्यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनात राष्ट्रीय सेवायोजनेत स्वयंसेवक म्हणून केलेल्या कामांच्या अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले.

शिबिर समारोप कार्यक्रमाचे आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. पूनमजमदाडे यांनी केले. कार्यक्रमाचे छायाचित्रकरण विजय चव्हाण यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!