Headlines
Home » जळगाव » के.सी.ई. इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात नवरात्रोत्सव निमित्त ढोलीडा २.० चे आयोजन

के.सी.ई. इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात नवरात्रोत्सव निमित्त ढोलीडा २.० चे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयांत नवरात्रोत्सव निमित्त ढोलीडा २.० चे आयोजन करण्यात आले होते. दि ७ ऑक्टो २०२४ रोजी महाविद्यालयांत संद्याकाळी प्राचार्य डॉ.संजय सुगंधी यांच्या हस्ते देवीची आरती करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा सर्वांगीण विकास, ओळख परिचय, व लुप्त गुणांना संधी देणे होय.

या कार्यक्रमासाठी विशेष प्रोत्साहन अकॅडमिक डीन डॉ. प्रज्ञा विखार यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व क्वालिटी बुक डेपो, सप्तशृंगार ब्युटी पार्लर अँड सेंट्रल स्पोर्ट्स जळगाव यांनी केले. जवळपास २०० ते २५० विदयार्थ्यांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे या कार्यक्रमात भरगोस असे बक्षीस वाटप देखिल करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या यश्वीतेसाठी प्रा. रेवती पाटील, प्रा.हेमंत धनधारे, प्रा.सचिन नाथ, प्रा.शेफाली अग्रवाल, यांची उल्लेखनीय कामगिरी होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!