जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथिल के.सी.ई. अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयात अर्थनीती जागरूकता कार्यशाळा ॲड्वाइझर्स ऑर्गनाईझशन यांच्या संयुक्त विद्यमाने के.सी.ई. च्या विद्यार्थ्यांसाठी व महिला कर्मचारी वर्गासाठी कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत विद्यार्थी व कर्मचारी वर्गाला गुंतवणूक या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
म्युचल फंड, शेअर मार्केट लिक्विड फंडमध्ये गुंतवणूक कोठे, कशाप्रकारे करावी याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. या कार्यशाळेसाठी ॲड्वाइझर्स ऑर्गनाईझशन कडून ट्रेनर म्हणून रोहित मिश्रा यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यशाळेचे आयोजनासाठी डॉ.संजय सुगंधी प्रा.शेफाली अग्रवाल, प्रा.हेमंत धनधारे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरुषी व हर्षा औश्यानी यांनी केले. कार्यक्रम समन्व्यक म्हणून प्रा. देवेंद्र पाटील प्रा. रेवती पाटील यांचे सहकार्य लाभले.
