Headlines
Home » जळगाव » न्यायदंडाधिकारी नरेश बारी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान

न्यायदंडाधिकारी नरेश बारी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : पुणे येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी नरेश सोमा बारी यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून विधी विभागाच्या वतीने “निगोशियबल इन्स्ट्रुमेंट्स विथ रेफरेन्स टु डिसओनर ऑफ चेक इन इंडिया अँड ॲनालिटीकल स्टडी” या विषयावर डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.

एस.एस. मणियार विधी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. विजेता सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पीएच.डी. संशोधन पूर्ण केले. यावेळी विद्यापीठाच्या विधी विभागाचे सहअधिष्ठाता प्राचार्य प्राध्यापक डॉ. विजय बहिराम तसेच एस.एस. मणियार विधी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉ. बी. युवाकुमार रेड्डी यांनी डॉ. नरेश सोमा बारी यांचे मनपूर्वक अभिनंदन केले. या यशात त्यांना एस.एस. मणियार महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!