Headlines
Home » जळगाव » वावडदे महावितरण उपकेंद्रास सहव्यवस्थापकीय संचालक यांची भेट

वावडदे महावितरण उपकेंद्रास सहव्यवस्थापकीय संचालक यांची भेट

वावडदे ( वास्तव पोस्ट ) : जळगाव तालुक्यातील वावडदे येथे महावितरणाच्या सब स्टेशन येथे आज बुधवार दि.१५ जानेवारी रोजी सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे IAS यांनी मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी जळगाव झोन व अधीक्षक अभियंता अनिल महाजन जळगाव, तसेच वावडदा कक्ष कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता आकाश सोनवणे यांनी भेट दिली. या भेटीत वावडदा विभाग प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा ईवम उत्थान महाअभियान (पीएम कुसुम योजना) ची पाहणी केली.

याप्रसंगी ग्रामीण उप विभागाचे उपकार्यकारी अभियंता विजय कापुरे तसेच वावडदा कक्षाचे कर्मचारी गणेश पाटील, संदीप अत्तरदे, दिनेश पाटील, अमोल भगत, शिवाजी काळे, संतोष सरदार, प्रदीप खवडे, जीवन रोकडे इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!