नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जिओ आपल्या वापरकर्त्यांसाठी नेहमी नवनवीन सुविधा घेऊन येत असते नुकतेच त्यांनी वाढवलेल्या रिचार्ज दरांवर मात्र वापरकर्ते भडकले होते. पण आता जिओने देशातील पहिली अशी 5G वापरणारी मेसेजिंग आणि कॉलिंग ॲप म्हणजे JioSafe लॉंच केले आहे. भारतातील telecom क्षेत्रातील दिग्गज Jio कंपनीने आपल्या 4G आणि 5G सेवा आणखी सुविधांनी सज्ज करत आहे. यात JioSafe हा अत्याधुनिक सुरक्षित संवाद साधण्यासाठीचा ॲप आघाडीवर आहे. हा ॲप विशेषत: व्हिडिओ कॉलिंगसाठी उपयुक्त आहे.
JioSafe हा Android आणि iOS दोन्ही प्रकारच्या स्मार्टफोनवर उपलब्ध आहे. सध्या या ॲपसाठी दर महिना रु. 199 इतके शुल्क आहे. परंतु, सध्या विशेष ऑफर अंतर्गत पहिल्या वर्षासाठी मोफत आहे. Jio चे धोरण आहे की, व्हिडिओ कॉलिंगच्या सुरक्षित बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करावे.
JioSafe पाच स्तरांच्या सुरक्षा लेवलमध्ये बनले आहे. त्यामुळे Jio चे म्हणणे आहे की, हे ॲप हॅक करणे अशक्य आहे. वापरकर्ते या ॲपद्वारे मेसेज पाठवू शकतात, ऑडिओ कॉल करू शकतात आणि व्हिडिओ कॉल देखील करू शकतात. पण, लक्षात घ्या JioSafe वापरण्यासाठी काही खास गोष्टींची आवश्यकता आहे ज्यामुळे तो बाकीच्या मेसेजिंग आणि कॉलिंग ॲपपेक्षा वेगळा ठरतो.
या ॲपला चालण्यासाठी 5G स्मार्टफोन, Jio सिमकार्ड आणि 5G नेटवर्क लागते. जर यापैकी एखादीही गोष्ट तुमच्याकडे नसेल तर हा ॲप चालणार नाही. म्हणजेच, Jio चे 4G वापरणारे ग्राहक JioSafe वापरू शकणार नाहीत. याशिवाय, सध्या JioSafe फक्त भारतातच उपलब्ध आहे. म्हणजेच, भारताबाहेर राहणारे वापरकर्ते हा ॲप वापरू शकणार नाहीत.
JioSafe वापरण्यासाठी अतिरिक्त 5G डाटा असलेळे प्लॅन असणेही आवश्यक आहे. पुढच्या वर्षापासून या ॲप वापरण्यासाठी दर महिना शुल्क भरावे लागणार आहे. JioSafe फक्त साइनअपसाठीच नाही तर प्रत्येक मेसेज आणि कॉलसाठी देखील 5G नेटवर्कची आवश्यकता आहे. हा ॲप वैयक्तिक आणि ग्रुप व्हिडिओ कॉल (सिक्योर रूम) ची सुविधा देतो. या ग्रुप कॉलमध्ये एकाच वेळी पाच जण सहभागी होऊ शकतात.
◆ JioSafe खरोखर सुरक्षित आहे का?
Jio कंपनीचा दावा आहे की, JioSafe हा पूर्णपणे सुरक्षित आहे. कारण तो Jioच्या 5G नेटवर्कवर चालतो ज्याला भेदणे अशक्य आहे. JioSafe द्वारे केला जाणारा प्रत्येक कॉल एन्क्रिप्टेड असतो. त्यामुळे चोरी होण्याचा धोका नाही. 5G नेटवर्क हे 4G/3G/2G पेक्षा अधिक मजबूत असल्यामुळे JioSafe ची सुरक्षा आणखी वाढते.
Jio चे 5G स्टँडअलोन (SA) नेटवर्क हे 256-bit एन्क्रिप्शन आणि सब्सक्रायबर कॉन्सील्ड आयडेंटिटी (SCI) या तंत्रज्ञानाचा वापर करते. SCI वापरकर्त्याची ओळख लपवून ठेवते. या सर्व गोष्टींमुळे JioSafe हा एक सुरक्षित संवाद साधण्याचा ॲप म्हणून आशादायक वाटतो. JioSafe वापरकर्ते कोणत्या कॉन्टॅक्टशी सुरक्षित संवाद साधू शकतात.
