Home » जळगाव » जळगांव जिल्हा परिषदेकडून मालमत्ता शोध मोहीमेस प्रारंभ

जळगांव जिल्हा परिषदेकडून मालमत्ता शोध मोहीमेस प्रारंभ

जळगांव ( वास्तव पोस्ट ) : जळगांव जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या मालकीच्या विविध स्थावर मालमत्तांचा शोध घेण्यासाठी व मालमत्तेची अचूक नोंद करण्यासाठी जिल्हा परिषदेने एक विशेष “मालमत्ता शोध मोहीम” सुरु केली आहे. या उपक्रमाची संकल्पना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी मांडली होती.

या मोहिमेअंतर्गत संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर जिल्हा परिषद मालकीच्या जमिनी, इमारती, शाळा, अंगणवाड्या, आरोग्य केंद्रे, शेतजमिनी, रिकाम्या जागा व इतर मालमत्तांचा शोध घेऊन संबंधित माहिती एकत्रित केली जात आहे. संकलित माहिती जिल्हा परिषद मुख्यालयात पाठविण्याचे निर्देश सर्व तालुका व गट स्तरावर दिले गेले आहेत.

या मोहिमेमुळे जिल्हा परिषदेच्या मालमत्तेची नेमकी यादी तयार होणार असून, भविष्यातील नियोजन, विकास कामे, संरक्षण व महसूल वाढीच्या दृष्टीने या माहितीचा उपयोग केला जाणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना वेळेत व अचूक माहिती सादर करण्याचे निर्देश दिले असून, या उपक्रमामुळे जिल्हा परिषदेच्या मालकीच्या मालमत्तांचा पारदर्शक व शिस्तबद्ध नोंदवही तयार होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!