Home » जळगाव » महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जळगाव(ग्रा) जिल्हा सचिव पदी इकबाल पिंजारी

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जळगाव(ग्रा) जिल्हा सचिव पदी इकबाल पिंजारी

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : रावेर तालुक्यातील पाल येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ जळगाव जिल्हा आयोजित कार्यक्रमामध्ये संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे यांच्या आदेशाने जळगाव(ग्रा) जिल्हाध्यक्ष संतोष नवले यांनी इकबाल पिंजारी यांची सर्वानुमते महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जळगाव(ग्रा) जिल्हा सचिव पदी निवड केली.

सविस्तर वृत्त असे की, पाल येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई, शाखा जळगाव आयोजित शालेय विद्यार्थ्यास शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात जळगाव जिल्हा संघटनेची बैठक घेण्यात आली, त्यात इकबाल पिंजारी यांचे संघटनेसाठी मागील कार्य बघता तसेच त्यांनी रावेर तालुका सचिव पदी असताना पार पाडलेली जबाबदारी बघून संघटनेच्या वरिष्ठांकडून त्यांच्या कार्याची दखल घेलती गेली आणि इकबाल पिंजारी यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जळगाव(ग्रा) जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली.

याच दरम्यान रावेर तालुका अध्यक्ष पदी रवींद्र महाजन, तालुका उपाध्यक्ष पदी सुमित पाटील तर कार्याध्यक्ष पदी विजय एस. अवसरमल तसेच राजेश चौधरी यांची सावदा शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

या प्रसंगी राज्याचे कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे, जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष नवले, जिल्हा कार्याध्यक्ष योगेश सैतवाल, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पवार, प्रभाकर महाजन, मनीष चव्हाण, गणेश भोई, मगन पवार, सरदार पिंजारी, प्रदीप कुलकर्णी, कैलास लवंगडे, विजय के. अवसरमल, आनंद भालेराव, संजय मानकरे, योगेश पाटील, तसेच परिसरातील पत्रकार बांधव उपस्थित होते.
उपस्थित सर्व पत्रकार बांधवांकडून निवडी बाबत शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!