जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चमध्ये १० वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी योग मार्गदर्शक म्हणून मू. जे. महाविद्यालय स्वायत्त, जळगाव संचलित सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी विभागातील प्रा. डॉ. सोनल महाजन उपस्थित होत्या.
यावेळी प्रा. डॉ. सोनल महाजन यांनी दैनंदिन जीवनातील योगाचे महत्त्व, तसेच या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे ‘योगा फॉर सेल्फ अँड प्रॅक्टिस’ चे महत्त्व पटवून दिले. योगाच्या माध्यमातून संपूर्ण समाज हा आरोग्यमय आणि प्रगतीशील व्हावा, यासाठी प्रत्येकाने योग करावा, असे आवाहन केले. त्यांनी सर्व प्राध्यापक व इतर कर्मचारी यांच्याकडून योग सराव करून घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. निलिमा पाटील यांनी केले. इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा. बी. व्ही. पवार यांनी मार्गदर्शन करतांना प्रत्येकाने दैनंदिन जीवनात योग करण्याची सवय लावावी, असे आवाहन केले. कार्यक्रमासाठी इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा. बी.व्ही. पवार, डॉ. ममता दहाड (स्कूल ऑफ डायरेक्टर मॅनेजमेंट विभाग) यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन डॉ. नीलिमा पाटील यांनी केले.
