Headlines
Home » जळगाव » CAS अंतर्गत प्राध्यापकांच्या स्थाननिश्चितीबाबत अन्याय ; एन मुक्ताचे शिक्षण सहसंचालकांना निवेदन

CAS अंतर्गत प्राध्यापकांच्या स्थाननिश्चितीबाबत अन्याय ; एन मुक्ताचे शिक्षण सहसंचालकांना निवेदन

सहसंचालक शिक्षण विभाग जळगाव यांना निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष तथा प्राध्यापक

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : CAS अंतर्गत प्राध्यापकांचे उद्बोधन व उजळणी वर्ग वेळेवर न झाल्यामुळे स्थाननिश्चिती रुजू दिनाकांपासून दिली गेली नाही, उद्बोधन व उजळणी वर्ग झालेल्या दिनाका पासून करण्यात आली. तरी सदरील शासन परिपत्रकानुसार सर्व प्राध्यापकांना त्यांच्या मुळ दिनांकापासून स्थाननिश्चिती देण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन सहसंचालक शिक्षण विभाग जळगाव यांना देण्यात आलेले आहे.

एन मुक्ताचे सदस्यांनी दिलेल्या या निवेदनामध्ये म्हटले आहे की, परिपत्रक २४ जून २०२४ नुसार CAS अंतर्गत च्या स्थाननिश्चिती बाबत पूर्तता न करता प्रस्ताव परत करण्यात आला आहे. दि. २४ जुन २०२४ च्या परिपत्रकानुसार ‘ज्या प्राध्यापकांचे उद्बोधन व उजळणी वर्ग वेळेवर न झाल्यामुळे स्थाननिश्चिती रुजू दिनाकांपासून दिली गेली नाही, ती उद्बोधन व उजळणी वर्ग झालेल्या दिनाकांपासून करण्यात आली. तरी सदरील शासन परिपत्रकानुसार सर्व प्राध्यापकांना त्यांच्या मुळ दिनांकापासून स्थाननिश्चिती देण्यात यावी. असा शासन निर्णय असून राज्यातील सर्व सहसंचालक कार्यालयांनी स्थाननिश्चिती दुरुस्ती साठी प्रस्ताव मागविले आहे.

संबंधित सर्व प्राध्यापकांनी आपल्या कार्यालयात स्थाननिश्चिती दुरुस्ती साठी प्रस्ताव सादर केलेले असून, त्यावर कुठलीही कार्यवाही न करता आपण शासन निर्णयातील 7.4 (B) (10) (1) मधील CAS promotion criteria (1) (1) नुसार या कार्यालयाकडून अध्यापकांच्या करावयाच्या स्थाननिश्चिती तरतूद नसल्याने आपण सादर केलेला प्रस्ताव परत करण्यात येत आहे, असे नमूद करून संबंधित प्राध्यापकांना पत्र पाठवले आहे. त्यामुळे संबंधित प्राध्यापकांवर एक प्रकारे अन्याय झाला आहे.

प्रस्ताव ज्या शासन परिपत्रकाचा संदर्भ देण्यात आलेला आहे तो योग्य नाही. प्राध्यापकांच्या प्रतिदिन होणाऱ्या नुकसानास आपण व्यक्तीशः जबाबदार रहाल याची नोंद घ्यावी व या विरोधात एनमुक्ता लवकरच आंदोलन उभारणार आहे. या निवेदनावर अध्यक्ष प्रा.डॉ. एन.यु. बारी, सचिव प्रा. डॉ. पी.सी. पाटील यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!