जळगाव (वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. सोसायटी चे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविदयालयात ‘दिक्षारंभ ‘या संकल्पनेतून महाविद्यालायकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन दि १३ सप्टेंबर २०२४ पासून करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आलेल्या नवप्रवेशीत विद्यार्थी व पालक यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. महाविदयालयाच्या नवीन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सभागृहात आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख् पाहुणे मु.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स.ना.भारंबे, तसेच डॉ.अशोक राणे, यांचे हस्ते करण्यात आले. व्यवस्थापन शाखेचे प्रा.कोमल जैन यांनी डॉ स.ना.भारंबे याच्या कार्याची ओळख करून दिली.डॉ. स.ना.भारंबे यांनी त्यांच्या भाषणातून विदयार्थ्यांना दिक्षारंभ या शब्दाचा अर्थ सांगितला तसेच मूल्यधारित शिक्षण व नवीन शैक्षणिक धोरण २०२० या विषयी महत्व सांगितले.
व्यवस्थापन शाखेचे विभाग प्रमुख प्रा.हर्षा देशमुख यांनी डॉ.अशोक राणे यांची ओळख करून दिली. डॉ.अशोक राणे यांनी त्यांच्या भाषणातून कौशल्य विकास शिक्षण यावर भर दिला. तसेच शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामूळे शिक्षण संपत नाही असेही प्रतिपादन केले.
अभ्यासेतर कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ.संजय सुगंधी यांनी केले. तसेच महाविद्यालयाच्या अकॅडेमिक डीन डॉ. प्रज्ञा विखार यांनी महाविद्यालयाची माहिती व उपलब्ध सोयी सुविधा व इतर उपक्रम या विषयी माहिती दिली.
श्वेता चौधरी व ग्रुप ने समाजात वाढलेला स्वैराचार कसा रोखता येईल यावर मुकनाटक सादरीकरण केले. उपस्थित विदयार्थ्यांनी कार्यक्रमाला भरभरुन प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या दरम्यान उपस्थित विद्यार्थी व पालक वर्ग यांनी अल्पोहाराचा आनंद घेतला
यादरम्यान सोहम डिपार्टमेंट ऑफ योग् अँड नॅचरोपॅथी विभाग मु.जे. महाविद्यालयाचे डॉ. देवानंद सोनार यांनी प्राणायाम, सूर्यनमस्कार विविध योगासने व शिक्षणातील योगाचे महत्व विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक रित्या विशद केले. प्रयोगातून विज्ञान या कार्यक्रमात प्रात्यक्षिक द्वारे विज्ञान सदरील कार्यक्रमास मार्गदर्शक प्रा. दिलीप भारंबे मराठी विज्ञान परिषद जळगाव यांनी विज्ञानातील विविध प्रयोगांचे प्रात्यक्षिक करून विद्यार्थ्यंना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे निरसन त्यांनी केले या कार्यक्रमात भौतिक शास्रातील प्रिंसिपल, नियम व त्यांचे इंजिनीयरिंग मधील उपयोग, अँप्लिकेशन कसे करतात या संबधीत वेगवेगळे प्रयोग सादर करण्यात आले.
अंताक्षरी कार्यक्रमात विदयार्थ्यांनी धमाल केली. तसेच ड्रॉईंग अँड आर्टस अँड क्राफ्ट स्पर्धेत विविध विषयावर चित्र सादर केली. प्रा.अश्विनी देवराळे यांनी जागतिक वैश्विक मूल्य या विषयावर महत्व सांगितले. मॅथ्स ऊईथ फन कार्यक्रमात प्रा.अमित लड्ढा यांनी गणित कसे सोडवावीत या बद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या वेळी प्राचार्य डॉ. संजय सुगंधी, अकॅडमिक डीन् डॉ. प्रज्ञा विखार, प्रा.हर्षा देशमुख, प्रा.कोमल जैन, डॉ.वीणा भोसले, प्रा.दर्शन ठाकूर, प्रा.अविनाश सूर्यवंशी, प्रा.प्रसाद कुलकर्णी, प्रा.राहुल पटेल, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापकवृंद, शिक्षकेतरकर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रा. पूजा मराठे, विजय चौधरी व आभारप्रदर्शन् प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा.के.बी. पाटील यांनी केले.
