Home » जळगाव जिल्हा » भुसावळ तहसील कार्यालयाच्या इमारतीच्या पहिल्या मजल्याचे उद्घाटन

भुसावळ तहसील कार्यालयाच्या इमारतीच्या पहिल्या मजल्याचे उद्घाटन

भुसावळ ( वास्तव पोस्ट ) : सेवा पंधरवडा चे औचित्य साधून महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते भुसावळ तहसील कार्यालयाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या प्रशस्त व सर्वसुविधा संपन्न इमारतीच्या पहिल्या मजल्याचे उद्घाटन करण्यात आले. सदर प्रसंगी कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित व तहसीलदार नीता लबडे यांची उपस्थिती होती.

नवीन इमारतीमुळे भुसावळ तालुक्यातील नागरिकांना शासकीय कामकाज सुबक व सुलभ वेगवान तसेच पारदर्शक पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचतील. प्रशस्त हॉल्स, आधुनिक सोयीसुविधा सोयीस्कर व्यवस्था उपलब्ध होणाऱ्या शासकीय सेवा व सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नागरिकांना करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!