जळगाव | दि.२७ ( वास्तव पोस्ट न्यूज) – एकीकडे रोजगार नाही म्हणून बेरोजगार वणवण भटकत आहेत, किंवा कोणत्याही विभागाची भरती असली की तिथे असंख्य अर्जांचा अक्षरशः खच पडतो हे आपण बघतो. अशातच एका व्यक्तीने मात्र एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी शासनाच्या नियमानुसार सेवा बजावून शासनास अंधारात ठेवत दोन्ही ठिकाणचा पगार घेत शासनाची फसवणूक करणाऱ्याची चौकशी करावी अशी तक्रार, तक्रारदार प्रशांत तायडे यांनी शिक्षण विभाग माध्यमिक जळगाव यांच्याकडे केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, हर्षल तुकाराम बोरोले हे सन २०१९ पासून जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी जळगाव, या संस्थेच्या रावेर ता. रावेर या शाखेत कार्यरत असतांनाही हर्षल बोरोले यांना धनाजी नाना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खिरोदा या शाळेत ‘प्रयोगशाळा सहाय्यक’ म्हणून सन २०२० या वर्षात नियुक्ती देण्यात आलेली आहे. हा फसवणुक व फौजदारी स्वरुपाचा गुन्हा आहे.

हर्षल बोरोले याचे वडील धनाजी नाना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खिरोदा या शाळेचे मुख्याध्यापक तसेच जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी जळगाव या संस्थेचे माजी अध्यक्ष व संचालक असतांना, प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून नोकरीला लावले. त्याच्या मान्यतेचा प्रस्ताव शिक्षण उपसंचालकांकडे सादर केला. त्याच्या नेमणूकीस वैयक्तिक मान्यता मिळविली, शालार्थ मान्यता मिळविली तसेच कायम मान्यता देखील घेतलेली आहे. संस्थाचालक, मुख्याध्यापक व हर्षल तुकाराम बोरोले यांनी शिक्षण विभागाची दिशाभूल करुन शासनाची फसवणूक केलेली आहे.
सदर शाळेतील बॅक डेटेड ने नियुक्ती केल्याची बाब उघडकीस येऊन अडचण निर्माण होऊ नये म्हणून त्याचा राजीनामा घेऊन पुन्हा नोकरी देण्यात आल्याचे सदर तक्रारदाराचे म्हणने असुन या प्रकरणाबाबत काही मुद्दे उपस्थित करून त्या अनुशंगाने सखोल चौकशी करावी व संबंधितांवर फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तक्रारदार प्रशांत तायडे यांनी केली होती. मात्र शिक्षण विभाग (माध्यमिक) सदर तक्रारीची कोणतीही दखल घेतली नाही. म्हणून फौजदारी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत प्रशांत तायडे हे शिक्षणाधिकारी (माध्यामिक) यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत.

सखोल चौकशी झाली पाहिजे