Home » जळगाव » सोहम मध्ये प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रकृती परीक्षण शिबिर संपन्न

सोहम मध्ये प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रकृती परीक्षण शिबिर संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : एम.जे. कॉलेज सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचर्रोपॅथी द्वारा प्रकृती परीक्षण अभियान अंतर्गत प्रकृती परीक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भारत सरकारच्या आयुष मंत्रालय अंतर्गत प्रकृती परीक्षण अभियान सर्वत्र राबविले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून डॉ.गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्या सहकार्याने एम. जे. कॉलेजचे सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी द्वारा या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरामध्ये प्रकृती परीक्षण या ॲपच्या माध्यमातून प्रकृती विषयक प्रश्न शिबिरामध्ये सहभागी लोकांना विचारण्यात आले आणि त्यावरून त्यांच्या प्रकृतीचे निदान करण्यात आले. महाविद्यालय परिसरातील विद्यार्थी, प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रकृती परीक्षण करण्यात आले. परीक्षण करणाऱ्या सर्वांना भारत सरकार आयुष मंत्रालयाच्या वतीने डिजिटल प्रमाणपत्र देण्यात आले.

प्रकृती परिक्षणासाठी डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता डॉ.हर्षल बोरोले, सहाय्यक प्राध्यापिका डॉ. कोमल खांडरे, डॉ. मुकेश चौधरी,त्याचे सर्व सहकारी आणि विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले. शिबिराच्या नियोजनाकरीता मू.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य सं.ना. भारंबे यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सोहम योग विभागाचे संचालक डॉ. देवानंद सोनार, प्रा.पंकज खाजबागे आणि सोहम योग विभागातील सर्व प्राध्यापकांचे विशेष सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!