जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथील संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्रातील आजी-आजोबा यांना माजी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील व उद्योजक धनराज कासाट यांच्या सहकार्याने संत श्री गजानन महाराज संस्थान शेगाव या ठिकाणी एक दिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले होते. शेगाव हे विदर्भासारख्या ग्रामीण भागात असलेलं लाखो भविकांचे श्रद्धास्थान असून रोज हजारो लोकं तिथे दर्शनाला येत असतात.

शेगाव येथे संत श्री गजानन महाराज यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन खूप आनंद झाला, अशा भावना बेघर निवारा केंद्रातील आजी-आजोबांनी व्यक्त केल्यात. यावेळी आजी-आजोबांनी दर्शना सोबत प्रसादाचा देखील आस्वाद घेतला. या सहलीबद्दल आजी-आजोबांनी प्रतापराव पाटील, धनराज कासाट, रेखा पाटील यांचे मनापासून आभार मानले व त्यांच्यासाठी प्रार्थना केली.

तसेच सहलीस जाण्यापासून ते येण्यापर्यंतचे सर्व नियोजन पत्रकार सोनम पाटील यांनी उत्कृष्ट आणि चांगल्या रीतीने केले.
दरम्यान, या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आश्रमातील मनोज कुलकर्णी, शितल काटे, हर्षल वंजारी यांचे मोलाचे सहकार्य या सहलीच्या आयोजनावेळी मिळाले.
