Headlines
Home » राजकीय » व्यूह रचना लोकसभेची: शिवसेना-उबाठा नेत्यांच्या एरंडोल व चाळीसगावात बैठकी; स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती

व्यूह रचना लोकसभेची: शिवसेना-उबाठा नेत्यांच्या एरंडोल व चाळीसगावात बैठकी; स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती

पाचोरा | दि.२१ (वास्तव पोस्ट न्यूज)– आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर, शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जळगाव लोकसभा मतदारसंघात जोरदार रणनिती आखण्यास प्रारंभ केला असून, त्या अनुषंगाने आज एरंडोल आणि चाळीसगाव येथे पक्षाची बैठक घेण्यात आली.

लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्याही क्षणाला लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. तर निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच पक्षाचे नेते आणि महत्वाच्या पदाधिकार्‍यांनी ठिकठिकाणी बैठका, गाठीभेटी सुरू केल्या आहेत. काल जळगाव येथे बैठक झाल्यानंतर आज एरंडोल आणि चाळीसगावात पक्षाची बैठक पार पडली.

याप्रसंगी शिवसेना-उबाठा पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी, ललीताताई पाटील, महिला जिल्हाप्रमुख महानंदाताई पाटील, महानगराध्यक्ष शरद तायडे, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, नाना महाजन, नाना कुमावत, नाना खलाणे, प्रशांत कुमावत, नकुल पाटील, निलेश गायके, विक्की भाऊ आदी पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

दरम्यान, शिवसेना-उबाठा पक्षाचे नेते आणि पदाधिकार्‍यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या नेत्यांची सदिच्छा भेट घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीबाबत विस्तृत चर्चा केली. यात प्रामुख्याने चाळीसगावचे माजी आमदार राजीवदादा देशमुख, डॉ.बोहरी, नाना भाऊ कुमावत, सविता ताई कुमावत, डी.के.चौधरी राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुका व शहर पदाधिकारी यांचा समावेश होता. तसेच एरंडोल येथील दशरथ महाजन, रमेश महाजन यासह असंख्य पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला भरभक्कम मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!