Home » महाराष्ट्र » निवासी डॉक्टरांपाठोपाठ ‘या’ तारखेपासुन राज्यातील शिक्षकेतर कर्मचारीही काम बंद आंदोलनावर

निवासी डॉक्टरांपाठोपाठ ‘या’ तारखेपासुन राज्यातील शिक्षकेतर कर्मचारीही काम बंद आंदोलनावर

पुणे दि. ६ ( प्रतिनिधी ) – राज्यात आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता महाराष्ट्र सरकार मतदारांना खूष करण्यासाठी वेगवेगळ्या योजना पूर्ण करत आहे . एकीकडे मराठा आरक्षणाचा विषय, दुसरीकडे निवासी डॉक्टरांच्या मागण्या आणि त्यात भर आता शिक्षकेतर कर्मचारीही संपावर जाणार आहेत. यामुळे राज्यात सरकारची सर्वच बाजूने कोंडी होताना दिसत आहे. कोकणातील सावंतवाडीमध्ये झालेल्या अधिवेशनात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दिलीप केसरकर यांनी दिलं होतं. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेच्या अधिवेशनात केसरकर यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न आठ दिवसात सोडवू, असं म्हटलं होतं. मात्र दिलेले आश्वासन आठ दिवस उलटूनही पूर्ण झाले नाही . त्यामुळे राज्यातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी संपावर जाणार आहेत. १२ फेब्रुवारीला पुण्यात शनिवार वाडा ते शिक्षण संचालक व शिक्षणायुक्त कार्यालय, सेंट्रल बिल्डिंग या मार्गाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा हा मोर्चा निघणार असुन २० फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!