Headlines
Home » जळगाव » अखेर महामार्गाच्या दुरुस्तीस सुरवात ; शासकीय तंत्रनिकेतन समोरील खचलेल्या महामार्गावर पेवर ब्लॉक्स बसवणार

अखेर महामार्गाच्या दुरुस्तीस सुरवात ; शासकीय तंत्रनिकेतन समोरील खचलेल्या महामार्गावर पेवर ब्लॉक्स बसवणार

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी खड्ड़यांच्या (पॅचेस) दुरुस्तीचे कामं हाती घेण्यात आले आहे. तसेच खोटेनगर, गुजराल पेट्रोल पंप ते मानराज पार्क तसेच शिव कॉलनी जवळील सर्विस रोडचे काम सुरु आहे. महामार्गालगत ज्या ठिकाणी पाणी साचते त्या भागाची देखील दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे कळते.

मागील चार दिवसांपासून ‘वास्तव पोस्ट’ने शासकीय तंत्रनिकेत प्रवेशद्वारा समोरील खचलेला महामार्ग किती धोकेदायक आहे याचे वास्तव चित्र प्रत्यक्ष स्पॉटवर जाऊन मांडले होते. याबाबत संबंधित विभागाच्या एका जबाबदार कर्मचाऱ्यास भेटून त्याच्या ही बाब लक्षात आणून दिली होती. त्यानुसार तात्काळ काही तासातच दखल घेऊन महामार्गाची वरवर खरडपट्टी करून काम सुरु असल्याचा जणूकाही अप्रत्यक्ष फलकच लावला होता.

मात्र या खरडपट्टीमुळे खचलेला महामार्ग अधिकच धोकेदायक बनला होता. कारण त्याठिकाणचे उंचवटे खरडून तेथील वेस्टेज मटेरियल त्याच खड्ड्यात टाकण्यात आल्याने रहदारीमुळे तेथील खडी, माती, कच सर्वत्र पसरला होता. त्यात दुचाकी वाहन चालवणे कठीण झाले होते.

आज पून्हा महामार्गाच्या सदर स्पॉटवर जाऊन ‘वास्तव पोस्ट‘ने पाहणी केली असता तेथे महामार्गाच्या खचलेल्या भागाचे दुरुस्तीचे काम सुरु असल्याचे दिसून आले. याआधी देखील अनेकवेळा दुरुस्ती तसेच ऑक्टोबर २०२३ च्या सुरवातीस अपेक्षित खर्च होता ५० लाख, मात्र पेक्षाही अधिक खर्च करून २०० मिटरचा महामार्ग खोदून नव्याने तयार केला होता. एवढं करूनही काहीच उपयोग न झाल्याने यावेळी दुरुस्तीसाठी मजबूत अशा ‘कॉन्क्रीट पेवर ब्लॉक‘ चा वापर कारण्यात येत आहे.

या बाबत अधिक माहिती जाणून घेतली असता काही दिवसांआधी इच्छादेवी चौफुली याठिकाणी अशा पेव्हर ब्लॉक चा वापर करण्यात आला व तो प्रयोग यशस्वी झाला म्हणून या ठिकाणी देखिल पेव्हर ब्लॉक वापरण्यात येणार असल्याचे सबंधित एका कर्मचाऱ्याने ‘वास्तव पोस्ट‘ ला सांगितले. तसेच रस्त्याखालून पाण्याचा प्रवाह असल्याने महामार्ग खचण्याची ही समस्या वारंवार उद्भवत असल्याचे सदर कर्मचाऱ्याने सांगितले.

पेव्हर ब्लॉक म्हणजे काय ?

काँक्रीट पेव्हर ब्लॉक्स हे सिमेंट, वाळू, पाणी आणि एकत्रितपणे मोल्डमध्ये टाकून तयार केले जातात. ते विविध आकार, आणि रंगांमध्ये बनवता येतात. नंतर मिश्रण घट्ट होण्यासाठी अनेक दिवस लागतात. या प्रक्रियेमध्ये प्रमाणीकरण, मिक्सिंग, कॉम्पॅक्टिंग, क्युरिंग आणि ड्रायिंग यांचा समावेश होतो. काँक्रीट ब्लॉक्स गुळगुळीत आणि खडबडीत पृष्ठभाग दोन्हीमध्ये येतात. ते मुख्यतः फुटपाथ बांधण्यासाठी वापरतात. हे इंटरलॉकिंग ब्लॉक असतात. ते अखंडपणे एकमेकांना जोडत असल्याने तुटण्याची शक्यता कमी असते. पेव्हर ब्लॉक्स हे हवामानास अनुकूल असतात. ते आकुंचन पावू शकतात आणि विस्तारू शकतात, ज्यामुळे क्रॅक विकसित होण्याचे धोके कमी होतात. पेव्हर ब्लॉक्सचा वापर त्यांच्या प्रती नुसार (क्वालिटी) रहदारी नसलेली क्षेत्रे, हलकी तसेच मध्यम वाहतूक, जड आणि खूप अवजड वाहतूक इत्यादी ठिकाणी करण्यात येतो.

असो, हे ब्लॉक्स बसविण्यास सोपे असतात. यामुळे कमी आर्थिक खर्च आणि कमी वेळात सहजपणे रस्ता दुरुस्त केला जातो. पाया मजबूत असला तर अधिक काळासाठी टिकाऊ अशी ही पद्धत आहे. एकंदरीत जळगाव शहरातुन जाणाऱ्या महामार्गावरील सदर स्पॉटवर पॅचेस पडण्याचे रूप व कालावधी बघता हे पेवर ब्लॉक किती दिवस तग धरतात हे येत्या काही दिववसांत दिसुनच येणार आहे.

(क्रमशः)

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!