जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी पालक शिक्षक संघाची कार्यकारिणी निवड करण्यात आली. ही निवड इयत्ता पाचवी ते दहावीच्या पालकांच्या सर्वसाधारण सभेतून करण्यात आली. मुख्यापिका प्रणिता झांबरे यांनी मार्गदर्शन केले.
या सभेत २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील पालक शिक्षक संघातर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धांचे नियोजन, विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण समारंभ, शिक्षक दिन समारंभ, प्रथम घटक चाचणी अभ्यासक्रम याविषयी चर्चा झाली. तसेच शिक्षण सप्ताह अंतर्गत तिथी भोजनाचाही आस्वाद पालकांनी विद्यार्थ्यांसोबत घेतला.

याप्रसंगी २०२३-२४ च्या पालक शिक्षक संघाच्या कार्यकारणीच्या सदस्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सुचिता बावस्कर यांनी केले. तर इ.पी.पाचपांडे यांनी आभार मानले.
◆ पालक शिक्षक संघ कार्यकारिणी :
अध्यक्ष :मुख्याध्यापक
उपाध्यक्ष : निरंजन वाणी,
पालक सचिव : सपना महाले,
शिक्षक सहसचिव : सुचिता बावस्कर.
विद्यार्थी प्रतिनिधी : दामोदर चौधरी,
सदस्य : रत्ना विशाल पाटील, मोहिनी राजेश कोष्टी, जितेंद्र अशोक बारी, गायत्री सोमनाथ शेवाळे, मीनाक्षी सुनील लोखंडे, प्रतिभा योगेश शिंदे, नीलेश अवधूत अत्तरदे, माधुरी रवींद्र सोनवणे, अश्विनी गजानन निंबाळकर, मिलिंद सुधाकर कोलते, दिपाली नितीन राणे, कृष्णा बकुळदास देशपांडे, जितेंद्र सोपान वाणी, सारिका मुकुंदा महाजन, पूनमचंद भीमा जाधव, परेश शालिग्राम सपकाळे, सोनाली दिगंबर ढाके. या सदस्यांचे स्वागत करण्यात आले.
