शेगाव ( वास्तव पोस्ट ) प्रतिनिधी l सुमित पाटील : शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना,महाराष्ट्र राज्य या संघटनेचे नाशिक विभागाचे मा. विभागीय उपाध्यक्ष किशोर पाटील यांचा शेगाव येथे संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशन तथा वार्षिक सर्वसाधारण सभेत सत्कार करण्यात आला. संघटनेच्या राज्य कार्यकारणीत कार्यरत असताना संघटनेचा प्रचार, प्रसार व विस्तार करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.

संघटनेच्या ध्येय धोरणाला व न्यायाचित मागण्यांना वेळोवेळी शासनासमोर त्यांनी प्रस्तुत केले तसेच संघटनेला आर्थिक समृद्धी प्राप्त करण्यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केले.
या अमूल्य अशा कार्याबद्दल त्यांना संघटनेतर्फे सन्मानित करण्यात आल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. किशोर पाटील हे सामाजिक कार्यात देखील नेहमी अग्रेसर असतात त्यांच्या कार्याचा व अनुभवाचा संघटनेसाठी भविष्यात देखील लाभ होईल असा आशावाद देखील मान्यवरांनी व्यक्त केला. राज्यस्तरीय अधिवेशनात सत्कार झाल्याबद्दल सर्व स्तरातून किशोर पाटील यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
