जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मानव सेवा विद्यालयात “एक पेड माॅं के नाम” या अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यांमार्फत शाळेच्या आवारात व घराजवळील परिसरात वेगवेगळे वृक्ष रोपण करण्यात आले. शाळेतील आवारात वृक्षारोपण प्रसंगी माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी, प्राथमिक मुख्याध्यापिका माया अंबटकर, बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील उपस्थित होते.
तसेच वाढदिवस असलेली विद्यार्थिनी, राजनंदिनी ज्ञानेश्वर पाटील हिच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.
तसेच इतर विद्यार्थ्यांनी आपल्या घराजवळील परिसरात सावली देणारे, फळ देणारे उपयुक्त झाडांची रोपे लावली व त्याचे फोटो आपापल्या वर्गांच्या ग्रुप वर टाकले.


यावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या रोपांचे संवर्धन करण्याचा संकल्प घेतला. अभियान अंतर्गत शाळेच्या परिसरात वृक्षदिंडी काढून ‘वृक्ष लावा वृक्ष जगवा’ अशा प्रकारच्या घोषणा देत जनजागृती करण्यात आली.

याप्रसंगी शिक्षक गिरीष जाधव व सुनील दाभाडे यांनी सीडबॉल कसे तयार करावे याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी यांनी वृक्षारोपणाचे फायदे सांगून हे अभियान राबविण्या मागचा उद्देश देखील विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनातून सांगितला.
