Home » जळगाव » जिल्हा परिषद जळगाव येथे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची भेट

जिल्हा परिषद जळगाव येथे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची भेट

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दि २० जून रोजी जळगाव जिल्हा परिषदेला भेट देऊन आढावा बैठक घेतली. या दौऱ्यात त्यांनी विविध विकास योजनांचा आढावा घेत जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली आणि प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या.

जिल्हा परिषदेच्या सविस्तर आढावा बैठकीदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी जिल्हा परिषदेच्या विविध योजनांची व प्रकल्पांची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. तसेच जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण, जलसंधारण, महिला व बालकल्याण, कृषी, पाणीपुरवठा यांसह विविध क्षेत्रांतील प्रगतीची माहिती विभागीय आयुक्तांना देण्यात आली.

या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, भाऊसाहेब अकलाडे, जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख तसेच सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजाची माहिती घेताना. योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी समन्वय, तांत्रिक दक्षता आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर देण्याचे निर्देश दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!