Home » क्रीडा » आंतर जिल्हा १४ वर्षाखालील मुलांचे क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी

आंतर जिल्हा १४ वर्षाखालील मुलांचे क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणऱ्या आंतर जिल्हा मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा मुलांचा संघ निवडण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन मंगळवार दि.२७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ८:३० वाजता जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानावर (विद्या इंग्लिश शाळेच्या मागे) आयोजित करण्यात आले आहे.

ज्या मुलांचा जन्म दिनांक १सप्टेंबर २०१० रोजी वा त्या नंतरचा असेल तेच मुले या निवड चाचणीसाठी पात्र असतील. सर्व इच्छुक मुलांनी या निवड चाचणीत जास्तीत जास्त संख्येने आपला सहभाग खाली दिलेल्या लिंक वर

https://forms.gle/rnd5WxDmLUgmdmi27

क्लिक करून गुगल फॉर्म व ऑनलाईन निवड चाचणी फी १०० रुपये भरून आपला सहभाग नोंदवावा व सोबत आपले आधार कार्ड व जन्म दाखला अपलोड करावा. तसेच निवड चाचणीसाठी क्रिकेट साहित्य, पांढरा गणवेश, शूज ओरिजनल जन्म दाखला आणि आधार कार्ड सोबत आणावे. असे आवाहन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी सचिव अरविंद देशपांडे (९४०४९५५२०५) व सहसचिव अविनाश लाठी (९८२२६१६५०३) यांचेशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!