Headlines
Home » जळगाव » ११ वर्षाखालील जिल्हा निवड बुध्दीबळ स्पर्धेचे ७ जून शनिवार रोजी आयोजन

११ वर्षाखालील जिल्हा निवड बुध्दीबळ स्पर्धेचे ७ जून शनिवार रोजी आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यातर्फे ११ वर्षाखालील बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन दि ७ जून  शनिवार रोजी सकाळी १०.०० वाजता कांताई सभागृह नवीन बस स्टँड जवळ जळगाव येथे करण्यात आलेले आहे.

या निवड चाचणीतून पुणे येथे दि १३ ते १५ जून दरम्यान होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी दोन मुले व मुली यांची निवड राज्य स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघात करण्यात येईल. ११ वर्षे वयोगटासाठी १ जानेवारी २०१४ नंतर जन्मलेले खेळाडू स्पर्धेसाठी पात्र राहतील.

स्पर्धा कांताई सभागृह नवीन बस स्टँड जवळ जळगाव येथे होतील. स्पर्धकांनी नाव नोंदणी कांताई सभागृह येथे प्रवीण ठाकरे, आकाश धनगर, परेश देशपांडे यांच्याकडे करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!