Home » सामाजिक » भावसार ऑर्गनायझेशन सर्विस च्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

भावसार ऑर्गनायझेशन सर्विस च्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगाव येथील भावसार समाज बहुउद्देशीय संस्था संचलित भावसार ऑर्गनायझेशन सर्विस (BOSS) च्या तर्फे १९ मे रोजी जळगाव येथील गायत्री मंदिरात गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचे कार्यक्रम अत्यंत दिमाखात संपन्न झाला. सर्व मान्यवरांचा शाल देऊन सत्कार झाल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली.

या कार्यक्रमात सत्तर हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यात एक डझन नवनीत वही, एक स्कूल बॅग, कंपास बॉक्स, लंच बॉक्स, पाणी बॉटल, असा संपूर्ण सेट देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य या कार्यक्रमाचे फलित होते. हा कार्यक्रम धुळे जळगाव नंदुरबार या संयुक्त जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला त्यामुळे समाजात एकीकरणाची भावना सुद्धा दिसून आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रकाश भावसार उर्फ पपडी पहीलवान जळगाव हे होते. ह.भ.प. भरत मार्तंड बऱ्हाटे महाराज, अरुण रामप्रसाद भावसार अमळनेर, सुभाष झेंडू भावसार धरणगाव, धुळे समाज अध्यक्ष गोपीचंद जानकीराम पांडव आणि कार्यकारणी तसेच जळगाव पिंपळा समाज अध्यक्ष पंडित उत्तमसेठ भावसार आणि कार्यकारणी हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!