Home » जळगाव » माजी आमदार दिलीप वाघ यांच्या वाढदिवसा निमित्त मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप

माजी आमदार दिलीप वाघ यांच्या वाढदिवसा निमित्त मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप

पिंपळगाव हरेश्वर ( वास्तव पोस्ट ) : आज अपंगांच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या आपल्या माजी विद्यार्थी संघ संचलित मूक बधिर निवासी विद्यालय, पिंपळगाव हरेश्वर येथे पाचोरा भडगाव मतदार संघाचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त दिनेश गायकवाड आणि सर्पमित्र ग्रुप, पिंपळगाव हरेश्वर ता. पाचोरा, जिल्हा जळगाव यांनी मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले.

यावेळी विद्यार्थ्यांशी हितगुज करून, त्यांचा आनंद द्विगुणीत केला. संस्था व विद्यालयाच्या वतीने माजी आमदार दिलीप वाघ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच दिनेश गायकवाड आणि सर्पमित्र ग्रुप यांचे आभार मानले. सदर प्रसंगी सर्पमित्र दिनेश गायकवाड, कल्पेश माळी, वैभव बडगुजर, प्रसाद साखरे तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक ईश्वर पाटील, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी मित्र उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!