जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूळजी जेठा महाविद्यालय जळगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विकसित भारत युथ पार्लमेंट स्पर्धेबद्दल चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक प्रा. डॉ. सचिन नांद्रे तसेच विभागीय संचालक प्रा.डॉ. राजू गवारे उपस्थित होते.
प्रा. डॉ.नांद्रे यांनी विद्यार्थ्यांना विकसित भारत तसेच माय भारत पोर्टल रजिस्ट्रेशन विषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन महाविद्यालयाचे तसेच विद्यापीठाचे नाव मोठे करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी विद्यापीठाच्या व केंद्र सरकारच्या विविध योजनांबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.विशाल देशमुख कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना मूळजी जेठा महाविद्यालय जळगाव यांनी केले. तर आभार प्रदर्शन महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. जयश्री भिरुड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. डॉ.अखिलेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली बहुसंख्य राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक हजर होते.
