Home » महाराष्ट्र » मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला हिंगोली जिल्ह्यातील हळद संशोधन केंद्राचा आढावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला हिंगोली जिल्ह्यातील हळद संशोधन केंद्राचा आढावा

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हिंगोली जिल्ह्यातील हळद संशोधन केंद्राचा आढावा घेण्यात आला. देश आणि जागतिक पातळीवरून हळदीला असलेली मागणी लक्षात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहित करून त्याचे क्लस्टर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मराठवाडा, विदर्भसारख्या दुष्काळग्रस्त भागात हळदीच्या उत्पादनाने सुवर्णक्रांती होईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

देशातील पहिले हळद संशोधन केंद्र वसमत येथे होत असून या केंद्रासाठी ८०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. तीन वर्षांमध्ये हा प्रकल्प तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

यावेळी पणन मंत्री अब्दुल सत्तार, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष, माजी खासदार हेमंत पाटील, कृषी विभागाच्या सचिव व्ही. राधा, भाभा अनुसंशोधन केंद्राचे प्रदीप मुखर्जी, केंद्रीय मसाले बोर्डाच्या महाराष्ट्र प्रमुख ममता रुपेलिया उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!