Headlines
Home » महाराष्ट्र » मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांचे आमंत्रण नाकारले,

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांचे आमंत्रण नाकारले,

मुंबई | दि.०१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकरणात फार मोठ्या घडामोडी झाल्या आहेत. एकेकाळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणारे एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यासोबत राहणारे अजित पवार आज भाजपची साथ देत आहेत. अशातच शरद पवारांनी नुकत्याच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना २ मार्च रोजी आपल्या निवासस्थानी चहापान-भोजनाचे आमंत्रण पाठवले होते. पण तिघांनीही शरद पवारांचे हे आमंत्रण नाकारले आहे.

दरम्यान शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना २ मार्चला आपल्या निवासस्थानी भोजनासाठी आमंत्रण दिले होते. या तिघांनाही शरद पवारांना एक पत्र लिहित म्हटले की, “एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच बारामती येत आहे. बारामतीत मुख्यमंत्री ‘नमो महारोजगार’ सोहळ्याला उपस्थिती लावणार असल्याने मी फार आनंदित आहे. यामुळेच मी माझ्या निवासस्थानी भोजनासाठी निमंत्रण देत आहे. मला अपेक्षा आहे की, तुम्ही या निमंत्रणाचा स्विकार कराल.”


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांच्या भोजनाचे निमंत्रण शासकीय कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्याने नाकारले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना एक पत्र लिहिले आहे. त्यांनी पत्रात म्हटले की, २ मार्चला कार्यक्रमात व्यस्त असल्याने भोजनाला उपस्थिती राहू शकत नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!