जळगाव ( वास्तव पोस्ट ) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वप्रथम जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी खासदार स्मिताताई वाघ, जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
