Headlines
Home » जळगाव » चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी लावला पाच दिवसांत छडा; तरवाडे येथुन सोन्याचे दागिने लांबविणारा चोरटा ताब्यात

चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी लावला पाच दिवसांत छडा; तरवाडे येथुन सोन्याचे दागिने लांबविणारा चोरटा ताब्यात

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ): चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे येथील ग्रामीण पोलिस स्टेशनला मुजाहिद जमशेद मोलाना रा. पिपरखेळ ह.मु.तरवाडे ता.चाळीसगाव यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध सोन्याची पोत व कानातील रिंग असा ६०हजाराचा ऐवज चोरीला गेल्याची फिर्याद चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन ला दिली होती. त्याआधारे पोलीसांनी गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपी शाहरुख शेख लाल रा.तरवाडे ता. चाळीसगाव यास मुद्देमालासह अवघ्या पाच दिवसांत तपासाचा छडा लावुन अटक केली.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वरी रेड्डी चाळीसगाव परिमंडळाच्या अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर चाळीसगाव भागाचे सहायक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रविण दाते, पोलिस उपनिरीक्षक कुणाला चव्हाण, हेड कॉन्स्टेबल जयेश पवार, युवराज नाईक, संदिप पाटील, शांताराम पवार, विजय शिंदे, सुनील पाटील यांनी केली व पुढील वर्षी तपास स.पो.नि. प्रविण दातरे यांच्या मार्गदर्शनाखाली जयश पवार करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!