जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे के.सी.ई. चे जनसंपर्क अधिकारी संदीप केदार तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्री फालक यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
त्यानंतर सर्व विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण केले. उपशिक्षक योगेश भालेराव यांनी विद्यार्थ्यांना त्रिशरण पंचशील चा अर्थ समजावून सांगत धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्त्व विशद केले व अशोका विजयादशमी ची ओळख करून दिली.
त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संदीप केदार यांनी विद्यार्थ्यांना धम्मचक्र प्रवर्तनाच्या इतिहासाची ओळख करून दिली. कार्यक्रमाचे आयोजन उपशिक्षक योगेश भालेराव, योगेश पाटील तसेच गायत्री पवार यांनी केले प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
