Headlines
Home » होम » Page 3

विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनातून यशाचा मंत्र आत्मसात करावा : मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : विज्ञान प्रदर्शन हा केवळ स्पर्धा नाही, तर तो आपल्या प्रयोगशीलतेला नवे आयाम देणारा एक मंच आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणारे आणि विद्यार्थ्यांच्या कल्पकतेस चालना देण्यासाठी उत्तम व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता प्रयोगशील विचारसरणी अंगी कारावी, जे जमते त्यावर अधिक भर द्यावा. विद्यार्थ्यांनी नव्या तंत्रज्ञानाचा अभ्यास…

Read More

सामान्य नागरिकांच्या मनात एकच प्रश्न…“महाराष्ट्र सुरक्षीत आहे का ?” महाराष्ट्रात सध्या सुरक्षेच्या मुद्द्यावर गहन चर्चा सुरू आहे. या चर्चेचा मुख्य विषय म्हणजे बॉलीवुड अभिनेता सैफ अलीवर झालेला चाकू हल्ला. वांद्रे येथील सैफ च्या घरामध्ये दि.१६ जानेवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मुंबईतील एवढ्या मोठ्या हायप्रोफाईल सोसायटीत हल्लेखोर शिरलाच कसा? असा सवाल सध्या चर्चेत…

Read More

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया तर्फे स्व.खाशाबा जाधव जयंती व राज्य क्रीडा दिन साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल येथे राज्य क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शारीरिक…

Read More

कॉलर का उडवतोस ? या क्षुल्लक कारणातून झालेल्या वादात एकाची गळा चिरून हत्या !

छत्रपती संभाजीनगर ( वास्तव पोस्ट ) : येथील उस्मानपुऱ्यात असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये १९ वर्षीय विद्यार्थ्याची त्याच्या फ्लॅटमध्ये घुसून अज्ञात मारेकऱ्यांनी गळा चिरुन निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवार दि.१४ रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली. ऐन संक्रांतीच्या दिवशी घडलेल्या या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. हत्या झालेल्या विद्यार्थ्याचे नाव प्रदीप विश्वनाथ निपटे (वय १९) असे…

Read More

राज्यातील विद्यापीठांमध्ये सायबर सुरक्षेबाबत अभ्यासक्रमाचा समावेश करणार : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

पुणे ( वास्तव पोस्ट ) : राज्यातील सर्व कुलगुरूंची बैठक घेऊन सायबर सुरक्षेबाबत अल्पकालीन अभ्यासक्रम तयार करण्यासह सर्व विद्यापीठात राबविण्यात येईल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. हे अभ्यासक्रम राबविल्यामुळे सायबर योद्ध्यांची एक नवीन पिढी तयार होईल, असेही ते म्हणाले. ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा अवॉर्ड्स’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी…

Read More

मू.जे. महाविद्यालयात वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेत राष्ट्रीय स्तरावरील MAESTRO स्पर्धा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खानदेश कॉलेज एज्यूकेशन सोसायटी संचालित मूळजी जेठा महाविद्यालयात वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेत राष्ट्रीय स्तरावरील MAESTRO स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये ऑनलाईन शेअर बाजार, बिझनेस आयडिया, प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि पॉवर पॉईंट सादरीकरण या चार प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एन. भारंबे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. के.सी.ई….

Read More

भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्षपदी नव्यांना संधी मिळणार का ?

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांची महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात निवड झाल्यानंतर पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्षपदी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. पुढच्या वर्षी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे भाजप मुंबई अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आशिष शेलार यांची…

Read More

नॅकच्या नवीन मूल्यांकन आणि मानांकन संदर्भात राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दोन टप्प्यातील नॅक मान्यता मध्ये सुधारणांसाठी आत्मनिरीक्षण आणि धोरण एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रातून महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतातील शिक्षणशास्त्र महाविद्यालयांना नॅक बंगलोर संस्थेकडून करावयाच्या नवीन मूल्यांकन आणि मानांकन…

Read More

राष्ट्रीय स्तरावर अबॅकस मध्ये ओरियन सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचे यश

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : दिल्ली येथे पार पडलेल्या युसी मास अबॅकसमध्ये के.सी.ई. सोसायटी संचलित ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश प्राप्त केलेले आहे. ज्यामध्ये आस्था बालकिसनजी चांडक या इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनीने राष्ट्रीय स्तरावर पाचव्या लेवल मध्ये व्दितीय स्थान प्राप्त केलेले आहे. तर इयत्ता चौथीचा विद्यार्थी सेजस दिपक जावळे याने चौथ्या लेवल…

Read More

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महापरिनिर्वाण दिन विशेष लेख

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, ज्यांना आपण आदराने ‘बाबासाहेब’ म्हणून ओळखतो, हे भारतीय इतिहासातील एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांनी महापरिनिर्वाण प्राप्त केले, परंतु त्यांचे विचार आणि कार्य आजही आपल्या जीवनावर आणि समाजावर प्रभाव टाकतात. त्यांचे जीवन समर्पण, संघर्ष, आणि सामाजिक न्यायाच्या चळवळीचे प्रतीक आहे. जीवन प्रवास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४…

Read More

निरमा विद्यापीठाच्या इंडस्ट्रिअल डिझाईन शाखेत पालवी जैन प्रथम ; पटकावले सुवर्ण पदक

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : गुजरात, अहमदाबाद स्थित निरमा युनिव्हर्सिटीत इंडस्ट्रिअल डिझाईन शाखेत शिक्षण घेणाऱ्या पालवी जैनला विद्यापीठातर्फे २२ नोव्हेंबर रोजी झालेल्या ३३ व्या पदवीप्रदान सोहळ्यात गोल्ड मेडल प्रदान करण्यात आले. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) चे गुजरातचे कार्यकारी संचालक आणि राज्य प्रमुख संजीब कुमार बेहरा हे या समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. निरमा विद्यापीठाचे…

Read More

स्वीप उपक्रम सत्कार समारंभात मु जे महाविद्यालया च्या रेडिओ मनभावनला गौरविले

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०२४ अंतर्गत जळगाव जिल्ह्यात SVEEP उपक्रमांतर्गत माननीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते जिल्हा नियोजन सभागृह , जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे प्राचार्य संजय भारंबे याना सन्मानित करण्यात आले. विधानसभा निवडणुकीत वाढलेला प्रतिसाद याकरिता विविध माध्यमानी जनजागृती करण्यात आली होती. केसीई सोसायटीच्या मुळजी जेठा महाविद्यालय यांच्या रेडिओ…

Read More

निवडणुकीत आर्थिक व्यवहारांसाठी केला बिटकॉइनचा वापर ; नाना पटोले आणि सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर आरोप !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : आज महाराष्ट्राच्या विधानसभा २०२४ मतदानाला सुरुवात झाली असून काल संध्याकाळी महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांवर भाजपाकडून गंभीर आरोप केले. यात पुण्यातील माजी पोलीस अधिकारी रवींद्र पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निवडणुकीत आर्थिक व्यवहारांसाठी बिटकॉईनचा वापर केल्याचा आरोप केला आहे….

Read More

विधानसभा निवडणूक २०२४ : मतदार जनजागृती मोहिमेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात डिजिटल चित्ररथास प्रारंभ

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्यात मतदान होणार आहे. त्याकरिता केंद्रीय संचार ब्यूरो विभागीय कार्यालय, पुणे यांच्यामार्फत जिल्ह्यात दि.११ पासून ते २० नोव्हेंबर पर्यंत डिजिटल चित्ररथ मार्फत मतदार जनजागृती करण्यात येत आहे. या अभियानाचा प्रारंभ जिल्हा परिषदेच्या प्रागंणात मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत यांच्या हस्ते करण्यात…

Read More

शोषणमुक्त सशक्त समाजाची निर्मिती केवळ गांधी विचारधारेनेच शक्य : डॉ. अनिल काकोडकर

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शोषणमुक्त समाजाची निर्मिती केवळ गांधी विचारधारेनेच शक्य आहे. कारण गांधी विचारधारेत अंत्योदयाचा विचार आहे. समाजातील वंचित, शोषीत व पीडित घटकांचा विचार आहे. ग्राम स्वराज सोबत सर्वांच्या सक्षमीकरणाचा विचार आहे. सध्याच्या ज्ञानयुगात प्रत्येकाच्या मनातील विश्वस्ताची भावना विकसित होण्यास पुरेसा वाव आहे, असे प्रतिपादन गांधी रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा अणुऊर्जा आयोगाचे…

Read More
error: Content is protected !!