Headlines
Home » जळगाव » Page 25

संत गाडगेबाबा यांच्या मूर्तीचा आगमन सोहळा उत्साहात

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहर परदेशी धोबी समाज मंडळ यांचेवतीने समाज शिरोमणी संत गाडगेबाबा यांच्या नवीन पुतळ्याचा आगमन सोहळा शहरात उत्साहात साजरा करण्यात आला उपनगरातील कालिंका माता मंदिर येथे माजी महापौर शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, नगरसेवक गणेश सोनवणे, पियूष कोल्हे, संदिप सोनवणे, हेमराज परदेशी, अमर परदेशी यांनी सात फूट उंचीच्या संत गाडगेबाबा…

Read More

गावांमध्ये शुद्ध पाण्यासाठी तातडीने उपाययोजना करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

जळगांव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्ह्यातील १७१ गावांतील २०५ जलस्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले असून, त्यामुळे ग्रामस्थांनां शुद्ध पाणी पुरवठा व्हावा यासाठी तातडीने दखल घेत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सविस्तर माहिती जाणून घेवून त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही भूजल विभागाने…

Read More

१०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीबाबत पालक सचिव तथा अपर मुख्य सचिव राजेशकुमार यांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत गुणवत्तापूर्ण अंमलबजावणीसाठी प्रभावी उपाययोजना ठरवण्यात आल्या. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील योजनांची सद्यस्थिती आणि आगामी कार्यवाहीबाबत सविस्तर सादरीकरण केले. प्रशासनाच्या कार्यक्षमतेत वाढ करून शासनाच्या योजना…

Read More

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून संत रविदास महाराज यांची जयंती साजरी

वरणगाव ( वास्तव पोस्ट ) : संत रविदास महाराज यांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये पोचविण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन काहूरखेडा ता. भुसावळ येथील राधाकृष्ण संत शिरोमणी गुरु रविदास मंदिर यांच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या कार्यक्रमाला वस्त्र उद्योगमंत्री संजय सावकारे आमदार चंद्रकांत पाटील, दिपनगर…

Read More

घरकुलांचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश : केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्ह्यास एकूण ९० हजार नवीन घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, आतापर्यंत ८४,६०० घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी संबंधित यंत्रणांनी शबरी, रमाई, पंतप्रधान आणि मोदी आवास या चारही घरकुल योजनांच्या कामांना गती द्यावी, असे निर्देश केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे यांनी…

Read More

के सी ई महाविद्यालयातील पॉलिटेक्निक विभागाचे हिवाळी २०२४ परीक्षेत यश

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : एम एस बी टी ई मुंबई ने घेतलेल्या हिवाळी २०२४ परीक्षेत के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील पॉलिटेक्निक विभागाने यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महाविद्यालयातील पॉलिटेक्निक विभागात कॉम्प्यूटर, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्यूटर, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल या शाखा आहेत. सदर महविद्यालयात जिल्ह्यातून तसेच बाहेर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. या…

Read More

जेईई मुख्य परीक्षेत हेत रिद्धी सचिन शेठ जळगाव जिल्ह्यात प्रथम

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्ह्यातील हेत रिद्धी सचिन शेठ याने JEE 2025 मुख्य परीक्षेत भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र गणित या विषयातून ९९.९५ पर्सेंटाइल गुण मिळवून जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक संपादन केला आहे. हेत रिद्धी सचिन शेठ याचे हे यश त्याच्या समर्पणाचे आणि मेहनतीचे फलित मानले जात आहे. हेतने आपल्या यशाबद्दल बोलताना सांगितले की,…

Read More

जळगाव औद्योगिक क्षेत्राला ‘डी प्लस ‘ झोन करण्यासाठी अर्थमंत्री सकारात्मक

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव मधील औद्योगिक वसाहत ही ‘डी -झोन’ मध्ये असल्यामुळे इतर जिल्ह्यातील उद्योगांना ज्या सवलती मिळतात, ते इथे मिळत नाहीत. त्यामुळे ‘डी -प्लस’ झोनचा दर्जा मिळावा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या या मागणीला उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अनुकूलता दर्शविली. तसेच जिल्ह्याला मंजूर ५७४.५९ कोटी हा नियतव्यापेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read More

विद्यार्थ्यांसाठी उद्योजकता विकास कार्यशाळेचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जळगाव आणि वाणिज्य व व्यवस्थापन विभाग, मु. जे. महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि.११, १२ व १३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान  वाणिज्य व व्यवस्थापन शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी उद्योजकता विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.  दि.११ फेब्रुवारी रोजी सकाळी११:०० वाजता, जुना कॉन्फरन्स हॉल येथे या कार्यक्रमाचे उद्घाटन पार पडले. या…

Read More

केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांनी अंकलेश्वर-बुरहानपूर राष्ट्रीय महामार्ग संदर्भात घेतली आढावा बैठक

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री तसेच रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी नवी दिल्ली येथील शास्त्री भवनातील आपल्या दालनात NHAI अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अंकलेश्वर – बुरहानपूर राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचा आढावा घेतला. हा महामार्ग महाराष्ट्र, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमधून जाणारा प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग असून,…

Read More

गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित ग्राम संवाद सायकल यात्रेचा समारोप

समस्यांना उत्तर शोधणाऱ्या युवकांची राष्ट्राला गरज : डॉ. लेकुरवाळे जळगाव ( वास्तव पोस्ट ) : आज राष्ट्राला समस्यांचे उत्तर शोधणाऱ्या युवकांची गरज असून ग्राम संवाद सायकल यात्रेत सहभागी सर्व यात्रींनी हे दाखवून दिले आहे; राष्ट्रासमोरील समस्यांचे उत्तर गांधीजींच्या विचारात असून आपण ग्राम संवाद सायकल यात्रेच्या माध्यमातून हे काम प्रामाणिकपणे केल्याचे दिसून येते असे प्रतिपादन कवयित्री…

Read More

“अटल वयो अभ्युदय योजना” विषयी माहिती आता रेडियो मनभावनवर

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय (भारत सरकार ) व सामुदायिक रेडिओ संघटना, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने “आमचे जेष्ठ, आमचा अभिमान“ या अभियानंतर्गत “अटल वयो अभ्युदययोजना” विषयी जिल्ह्याभरात जनजागृती करण्यासाठी सामुदायिक रेडियो मनभावन ९०.८ एफ.एम.च्या माध्यमातून राबविण्यात येणार असून अटल वयो अभ्युदय योजने सोबतच जेष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विविध योजनांची…

Read More

एस.एस. मणियार विधी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : एस.एस. मणियार विधी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन २०२५ चे पारितोषिक वितरण प्रमुख पाहुणे जिल्हा पोलीस उपअधीक्षक संदीप गावित, के.सी.ई. सोसायटीचे सचिव ॲड.प्रमोद पाटील, कवियित्री बहिणाबाई चौधरीउत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आंतरविद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. एस.टी. भूकन, आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.पवित्रा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार…

Read More

कान्ह ललित कला केंद्राच्या प्रतिशोध नाटकाची दिल्लीकरांना भुरळ

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथील केसीई सोसायटीचे कान्ह ललित कला केंद्र, जळगाव यांचे वैभव मावळे लिखित आणि दिग्दर्शित प्रतिशोध या हिंदी नाटकाने राष्ट्रीय नाट्य विद्यालय (एनएसडी), नवी दिल्लीअंतर्गत होणार्‍या भारंगम या आंतरराष्ट्रीय महोत्सवात अक्षरश भुरळ घातली. २८ जानेवारी ते १६ फेब्रुवारी २०२५ दरम्यान होणार्‍या महोत्सवात ४ फेब्रुवारी रोजी प्रतिशोध हे हिंदी नाटक सादर…

Read More

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यात रंगली सुरांची अविस्मरणीय मैफिल

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश काॅलेज एज्युकेशन सोसायटी संचलित गुरुवर्य प.वि.पाटील प्राथमिक विद्यामंदिर व ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी जिल्हास्तरीय गीतगायन स्पर्धा आयोजित करण्यात आली. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यातील स्वरगंधर्वाचा शोध घेत मागील चार वर्षांपासून स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहेत….

Read More
Top
error: Content is protected !!