जळगाव
दुःखी शेतकऱ्यांच्या वेदनांना स्पर्श करणारे व्यक्तिमत्व – रेखा चंदनकर
जळगाव | वास्तव पोस्ट वृत्तसेवा “सरकारी कार्यालय” म्हटले की सामान्यांच्या डोळ्यासमोर फाईल्सचा ढिगारा, चपला झिजवणारे हेलपाटे आणि लालफितीचा कारभार येतो. पण याच व्यवस्थेत काही अशी व्यक्तिमत्त्वे असतात, जी आपल्या कर्तव्यापलीकडे जाऊन ‘माणुसकीची’ भाषा बोलतात. जळगाव येथील विशेष भूसंपादन शाखेत कार्यरत असलेल्या रेखा चंदनकर हे नाव आज अशाच एका संवेदनशील आणि कर्तव्यनिष्ठ कार्याचा पर्याय बनले आहे….
जळगावमध्ये ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन
जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा जळगावकर नागरिकांसाठी रोटरी क्लब जळगाव आणि गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. गडचिरोलीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व आरोग्य तज्ज्ञ डॉ. सतीश गोगुलवार हे “आम्ही आमच्या आरोग्यासाठी” या विषयावर आरोग्याचे सूत्र मांडणार आहेत. सदर आरोग्यविषयक व्याख्यान हे शुक्रवार दि. २७ मार्च…
तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सची पूर्वा चौधरी हिला कांस्यपदक
जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा ओडिशा येथे नुकताच झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ तायक्वांडो स्पर्धेत पूर्वा चौधऱी हिने महिलांच्या ५३ किलोच्या वजन गटात कांस्यपदक पटकावले. ती जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमीची खेळाडू आहे. तिला प्रशिक्षक जयेश बाविस्कर तसेच मुख्य प्रशिक्षक अजित घारगे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे…
रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे डोंगर; शिरसोलीकडे जाणाऱ्या प्रवाशांचे आरोग्य धोक्यात!
जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा जळगाव शहरातून शिरसोलीकडे जाणारा मुख्य रस्ता सध्या रस्ता राहिला नसून तो अधिकृत ‘कचरा डेपो’ बनल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. श्रीकृष्ण लॉनपासून ते जुना जकात नका जळगाव शहराच्या हद्दीत असणाऱ्या या रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे डोंगर साचले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या रस्त्यावरून नेहमी मोठी वर्दळ असतानाही प्रशासनाचे डोळे उघडत नसल्याने संताप…
नदीत बुडणाऱ्या चौघांचे प्राण वाचवणाऱ्या बाल-देवदूताला जैन इरिगेशनचा आधार
जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा “दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी संपत्तीपेक्षा मनाच्या मोठेपणाची गरज असते,” हाच वारसा जपत जैन इरिगेशनने एका धाडसी बालकाचे भविष्य सावरले आहे. चोपडा तालुक्यातील अनेर नदीत बुडणाऱ्या चार मुलांचे प्राण वाचवणाऱ्या उमेश उर्फ ओम रवींद्र पाटील (१४) याच्या पुढील संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनने स्वीकारली…
जळगावात इंधन टंचाईच्या अफवेने गोंधळ; पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा
जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा आज २३ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास जळगाव शहरासह जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा बंद होणार असल्याच्या अफवेने एकच खळबळ उडाली. सोशल मीडियावर ‘पुढील तीन दिवस पेट्रोल मिळणार नाही’ अशा आशयाचे संदेश व्हायरल झाल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने पेट्रोल पंपांवर गर्दी केली. परिणामी, शहरातील मुख्य रस्त्यांवरील पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला…
बार कौन्सिल निवडणूक: जळगावातून ॲड. रेखा कोचुरेंच्या रूपाने नवा इतिहास घडणार?
जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा २०२६ च्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, उद्या २४ मार्च रोजी होणाऱ्या मतदानाकडे संपूर्ण राज्याचे विधी क्षेत्राचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत जळगावच्या वकिली क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक वळण पाहायला मिळत आहे. जळगाव न्यायालयातून पहिल्यांदाच एका महिला वकिलाने बार कौन्सिलच्या रिंगणात उडी घेतली असून, ॲड….
जैन इरिगेशन अन् NRCB मध्ये करार; केळीच्या दोन नवीन जातींची होणार निर्मिती
जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत जळगावच्या जैन हिल्सवर एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार संपन्न झाला. भारतीय कृषी अनुसंधान परिषद- राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र (NRCB), त्रिची आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, जळगाव यांच्यात ‘कावेरी वामन’ व ‘कावेरी पुवन’ या केळीच्या दोन नवीन…
जळगावमध्ये क्रिकेटचा धमाका! आयपीएलच्या धर्तीवर ‘JCL 2026’ पर्व २ ची घोषणा
जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा क्रिकेटवेड्या जळगावकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने ‘आर. सी. बाफना जळगाव क्रिकेट लीग (JCL) 2026 – पर्व २’ चे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या धर्तीवर होणाऱ्या या स्पर्धेची अधिकृत घोषणा संघटनेचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन…
कोरोना योद्ध्यांची मंत्रालयात धडक ; रिक्त पदांवर रुजू करून घेण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन
जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जिवाची पर्वा न करता सेवा देणाऱ्या कंत्राटी कामगारांना सध्या नवीन भरतीत डावलले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सध्या जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (GMC) ‘स्मार्ट’ कंपनीमार्फत सुरू असलेल्या भरतीत जुन्या अनुभवी कोरोना योद्ध्यांना डावलून वशिलेबाजी केली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात…
संतापाच्या भरात पतीनेच उद्ध्वस्त केले हसतेखेळते कुटुंब; तीन मुले पोरकी!
जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा जळगाव तालुक्यातील निमखेडी शिवारात गुरुवारी दुपारी रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. किरकोळ घरगुती वादाचे रूपांतर भीषण संघर्षात होऊन, एका ३५ वर्षीय पतीने आपल्या पत्नीवर लोखंडी विळ्याने सपासप वार करत तिची हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण निमखेडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या…
जैन हिल्सवर आधुनिक शेतीचा ‘शिवराज’ मंत्र; ठिबकवरील भात शेतीने केंद्रीय कृषीमंत्री भारावले
जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा भारताला शेती क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि जलव्यवस्थापन ही काळाची गरज आहे. जळगावच्या जैन हिल्सवर राबवलेले प्रयोग हे देशाला प्रगतीकडे नेणारे आहेत, असा विश्वास केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केला. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या जैन हिल्स येथील विविध कृषी प्रात्यक्षिकांची पाहणी करण्यासाठी ते जळगाव दौऱ्यावर आले…
जळगावात सुरांच्या पालवीने गुढीपाडव्याचे स्वागत; ‘चैत्र पालवी’ स्वरोत्सव उत्साहात
जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आणि चैत्राच्या प्रसन्न सायंकाळी, स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित “चैत्र पालवी स्वरोत्सव” अत्यंत उत्साहात संपन्न झाला. जळगाव येथे महात्मा गांधी उद्यानाच्या निसर्गरम्य वातावरणात रंगलेल्या या मैफलीने जळगावकर रसिकांना भक्ती आणि सुगम संगीताची अनोखी मेजवानी दिली. दिमाखदार प्रारंभ:कार्यक्रमाची सुरुवात प्रतिष्ठानच्या परंपरेनुसार भावपूर्ण ‘गुरुवंदने’ने झाली, जी प्रतिष्ठानचे कार्यकारी…
मानव सेवा विद्यालयात पुस्तकांची ‘शैक्षणिक गुढी’ उभारून आगळावेगळा गुढीपाडवा साजरा
जळगाव l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क पारंपरिक गुढीसोबतच ज्ञानाची गुढी उभारण्याच्या उद्देशाने ‘मानव सेवा विद्यालय’ येथे यावर्षीचा गुढीपाडवा अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. विद्यालयात राबविल्या जाणाऱ्या ‘समृद्ध ग्रंथालय’ उपक्रमांतर्गत चक्क पुस्तकांची गुढी उभारून वाचन संस्कृती जोपासण्याचा नवा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवण्यात आला आहे. वाचन संस्कृतीला चालना देणारा उपक्रम: मानव सेवा विद्यालयात गेल्या काही काळापासून ‘समृद्ध…
एल.एल.बी. चे शिक्षण घेत असल्याचे कारण दाखवत सर्वाधिक गुण असूनही उमेदवारास नियुक्ती नाकारली
विद्यापीठाची मनमानी : बेकायदा शिक्षण घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणारे प्रशासन पात्र उमेदवारावर अन्याय का करतेय? जळगाव l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क जळगाव : एकिकडे उच्च शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने स्वतःच एक धक्कादायक आणि अनाकलनीय निर्णय घेतला आहे. मास कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम विभागात सहाय्यक प्राध्यापक पदासाठी सर्वाधिक ८० गुण…
