मुंबई | दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईतील ८ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रिटिश कालीन नावं असलेल्या या रेल्वे स्थानकांचे आता नामकरण केले जाणार आहे.
मुंबईतील ज्या ८ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यास मान्यता मिळाली आहे त्यात, करी रोड रेल्वे स्थानकाचे नाव लालबाग असं केले जाणार आहे. तसेच सॅन्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाचं नाव – डोंगरी, मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाचं नाव – मुंबादेवी, चर्नी रोड रेल्वे स्थानकाचं नाव – गिरगांव, कॉटन ग्रिनचं रेल्वे स्थानकाचं नाव – काळाचौकी, डॉकयार्ड रेल्वे स्थानकाचं नाव – माझगांव, किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकाचं नाव – तिर्थकर पार्श्वनाथ, आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचं नाव – नाना जगन्नाथ शंकर शेट असं नामांतरण केलं जाणार आहे.
