Home » जळगाव » पासर्डी येथे एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी ; आठ लाखांचा ऐवज लंपास

पासर्डी येथे एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी ; आठ लाखांचा ऐवज लंपास

घटनास्थळी जाऊन नागरिकांकडून माहिती घेतांना पोलीस कर्मचारी

कजगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : कजगाव येथुन तीन किलोमीटरवर असलेल्या पासर्डी या गावी दि.१९ च्या रात्री अज्ञात चोरट्यांनी दोन घर फोडत सात ते आठ लाखाचा ऐवज लांबविला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. घटनेची माहीती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली.

सविस्तर वृत्त असे की, कजगाव भडगाव मार्गावर रस्त्यालगत असलेल्या भारत नगर मध्ये दि.१९ च्या रात्री अज्ञात चोरट्यांनी एकनाथ कीसन पाटील यांचे बंद घर फोडत येथुन आठ तोळे सोने आणि २०० ग्रॅम चांदी असा आजच्या बाजारभावाप्रमाणे अंदाजे ६ ते ७ लाखाचा ऐवज लांबवला.

तसेच शेजारीच असलेल्या युवराज हिंमत थोरात यांचे घर फोडत येथुन दिड तोळ्यांची सोन्याची पोत व २५ हजार रुपये रोख असा एक ते दिड लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. एकाच रात्री भरवस्तीत झालेल्या या दोन्ही घरफोडीत अंदाजे सात ते आठ लाखांचा ऐवज लांबवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर कजगाव पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक फौजदार छबुलाल नागरे, पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र पाटील,अमजद पठाण यांनी भेट देऊन पाहणी केली            

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!